Plane Crash : सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळले, १० जणांचा मृत्यू

अधिकाऱ्यांसह नागरिकांचा समावेश

49
Plane Crash : सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळले, १० जणांचा मृत्यू

सुदानमध्ये एका लष्करी विमानाचा अपघात झाला आहे. या घटनेत लष्करी अधिकारी आणि नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुदानी सैन्याने दिली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सुदानी सैन्याने एक निवेदन जारी केले आहे. (Plane Crash)

मीडिया रिपोर्टनुसार, हे विमान वाडी सेडना विमानतळावरून उड्डाण घेत असताना कोसळले, यामध्ये लष्करी कर्मचारी आणि नागरिक मृत्युमुखी पडले तर काही जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातस्थळी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले, असे निवेदनात म्हटले आहे. (Plane Crash)

(हेही वाचा – Maha Shivratri का साजरी केली जाते? काय आहे महत्त्व?)

अँटोनोव्ह विमानाच्या अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड होता. ग्रेटर खार्तूमचा भाग असलेल्या ओमदुरमनमधील लष्कराच्या सर्वात मोठ्या लॉजिस्टिक केंद्रांपैकी एक असलेल्या वाडी सेडना विमानतळाजवळ हा अपघात झाला. (Plane Crash)

प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले की, हा विमान अपघात झाल्यानंतर अनेक घरांचे नुकसान झाले. विमान कोसळल्यानंतर मोठा विस्फोट झाला. ज्यानंतर आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. दरम्यान, अल ओबैद हे सुदानच्या व्यापार आणि शेतीसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे शहर दक्षिण सुदान ते पूर्व सुदानमधील पोर्ट सुदानपर्यंत जाणाऱ्या तेल पाइपलाइनच्या मार्गावर आहे. (Plane Crash)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.