Beed Santosh Deshmukh Murder Case : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त

60
Beed Santosh Deshmukh Murder Case : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकीलपदी नियुक्त
  • प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. (Beed Santosh Deshmukh Murder Case)

महाराष्ट्र शासनाच्या कायदा व न्याय विभागाने दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, सदर नियुक्त्या महाराष्ट्र लॉ ऑफिसर्स (नियुक्ती, सेवा अटी व मानधन) नियम, १९८४ अंतर्गत करण्यात आल्या आहेत. या दोन्ही सरकारी वकिलांना बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात प्रलंबित असलेल्या C.R. No. 636/2024, C.R. No. 637/2024 आणि C.R. No. 638/2024 या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. (Beed Santosh Deshmukh Murder Case)

(हेही वाचा – Weather Update : राज्यात 6 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट; उत्तर-दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता)

सरकारचा ठाम निर्णय, निकम यांचा मोठा अनुभव

संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड जिल्ह्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरले होते. या गुन्ह्यात न्याय मिळावा आणि कठोर कारवाई व्हावी, यासाठी राज्य सरकारने ही महत्त्वपूर्ण नियुक्ती केली आहे. उज्ज्वल निकम यांनी आतापर्यंत अनेक गुन्हेगारी खटल्यांमध्ये प्रभावीपणे बाजू मांडून निकाल आपल्या बाजूने लावून घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीस वेग येण्याची अपेक्षा आहे. (Beed Santosh Deshmukh Murder Case)

शासनाच्या अटी व शर्ती लागू

या नियुक्त्या गृह विभागाच्या निधीतून करण्यात येणार असून, संबंधित वकिलांचे मानधनही गृह विभागाच्याच माध्यमातून दिले जाणार आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की, या नियुक्त्या कोणत्याही वेळी कारण न देता रद्द किंवा बदलल्या जाऊ शकतात. या निर्णयामुळे पीडित कुटुंबासह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. (Beed Santosh Deshmukh Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.