‘Vande Bharat’ मध्ये आता मराठी वृत्तपत्रे उपलब्ध होणार

37
'Vande Bharat' मध्ये आता मराठी वृत्तपत्रे उपलब्ध होणार
'Vande Bharat' मध्ये आता मराठी वृत्तपत्रे उपलब्ध होणार

केंद्र सरकारच्या (Central Govt) नियंत्रणाखाली असलेल्या ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ने (IRCTC) वंदे भारत (Vande Bharat) एक्स्प्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्रांना (Marathi Newspapers) दुय्यम स्थान दिल्याचे निदर्शनास आले होते. ज्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद (Mumbai Central to Ahmedabad) धावणाऱ्या वंदे भारत (Vande Bharat) एक्स्प्रेसमध्ये हिंदी, इंग्रजी आणि गुजराती वर्तमानपत्र मोफत उपलब्ध आहेत, मात्र मराठी वर्तमानपत्रांचा समावेश नव्हता. मात्र आता मराठी वर्तमानपत्राचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा-Veer Savarkar : “देश त्यांची तपस्या, त्याग आणि धाडस विसरू शकत नाही…” ; स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून अभिवादन

रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेने पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेसच्या (Vande Bharat) वेळेस मोफत मराठी वृत्तपत्र वाटप करण्याच्या हालचाली सुरू केल्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकात बंदोबस्त वाढवला होता. (Vande Bharat)

हेही वाचा- INS Guldar : कोकणच्या पर्यटनात आता युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ भर घालणार

दरम्यान, मुंबईत मराठी वृत्तपत्रे प्रवाशांना वाचायला देणे गरजेचे असल्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आणि ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये मराठी वृत्तपत्राचे वाटप करण्यास केली. सुरुवात मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेससह शताब्दी आणि अन्य प्रीमिअम रेल्वेगाड्यांमध्ये मराठी वृत्तपत्रांचे वाटप करण्यात येत आहे, असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Vande Bharat)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.