Jammu and Kashmir : राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला

52
Jammu and Kashmir : राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला
Jammu and Kashmir : राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) राजौरी (Rajouri) येथे बुधवारी (26 फेब्रु.) दुपारी लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला (Terrorist attack) झाला. सुंदरबनी (Sundarban) परिसरात दहशतवाद्यांनी घात लावून गोळीबार केला आहे. हल्ल्यानंतर लगेचच परिसराला घेराव घालण्यात आला. (Jammu and Kashmir)

हेही वाचा-Pune Crime : पुणे हादरलं! स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरूणीवर बसमध्ये अत्याचार

घटनेचे स्थळ सुंदरबनी येथील सीआरपीएफ बटालियन मुख्यालयापासून अंदाजे ५-६ किमी अंतरावर आहे. सुरक्षा दल या प्रदेशाची तपासणी करत आहेत. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर २-३ राउंड गोळीबार केला आणि नंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. (Jammu and Kashmir)

हेही वाचा-‘Vande Bharat’ मध्ये आता मराठी वृत्तपत्रे उपलब्ध होणार

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी भारतीय सैन्याने ७ पाकिस्तानी घुसखोरांना ठार केल्याची माहिती समोर आली होती. त्यामध्ये तीन पाकिस्तानी लष्करी जवानांचाही समावेश होता. (Jammu and Kashmir)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.