रवींद्र नाट्य मंदिर, लघु नाट्यगृह नव्या रूपात सज्ज; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी रोजी उद्घाटन

47
रवींद्र नाट्य मंदिर, लघु नाट्यगृह नव्या रूपात सज्ज; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी रोजी उद्घाटन
  • प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोठी भर घालणारा रवींद्र नाट्य मंदिर आणि लघु नाट्यगृह नव्या स्वरूपात सज्ज झाले आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘नूतनीकृत अकादमी संकुलाच्या’ उद्घाटन समारंभाचे आयोजन २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० वाजता करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या शुभहस्ते आणि अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. तसेच, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत हे देखील या भव्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

कला दिग्गजांची उपस्थिती आणि सांस्कृतिक कार्यक्रम

उद्घाटन सोहळ्यात मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, पुष्कर श्रोत्री, सुभाष नकाशे, नंदेश उमप आणि रोहन पाटील हे आपल्या कला सादर करणार आहेत.

रवींद्र नाट्य मंदिराच्या नव्या स्वरूपाची वैशिष्ट्ये

रवींद्र नाट्य मंदिराच्या जुन्या इमारतीला आधुनिक स्वरूप देण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या अंतर्गत सजावटीसह तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक प्रकाश आणि ध्वनीयंत्रणा, प्रगत रंगपट, अधिक आरामदायक आसनव्यवस्था यामुळे कलाकार आणि प्रेक्षक दोघांचाही अनुभव अधिक उत्तम होणार आहे.

तसेच, अत्याधुनिक परिषद सभागृह, खुले नाट्यगृह, नॅनो सभागृह, ऑडिओ-विज्युअल स्टुडिओ आणि एडिटिंग सुट्स नव्याने उभारण्यात आले आहेत. डॉल्बी ॲटमॉस ध्वनी यंत्रणा आणि चित्रपट प्रदर्शन व्यवस्था देखील उभारण्यात आली आहे. अकादमीत वादन कक्ष आणि सृजन कक्ष देखील नव्याने विकसित करण्यात आले आहेत. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पु. ल. देशपांडे यांचे स्मृतिदालन देखील सुरू करण्यात येणार आहे. या नव्या सुविधांमुळे कलाकारांना उत्तम प्रयोगशीलता आणि निर्मितीला चालना मिळेल. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Mahayuti मध्ये तणाव; भाजपाकडून शिवसेनेला इशारा?)

पु. ल. महोत्सव – पु. ल. आता बंगालीत!

नूतनीकरणानंतर १ मार्च २०२५ रोजी ‘पु. ल. महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच बंगाली भाषेत ‘आमार देखा किचू नमुना’ हे नाटक सादर होणार आहे. पु. ल. देशपांडे यांच्या प्रसिद्ध ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील काही व्यक्तिरेखांवर आधारित हा नाट्याविष्कार रुपांगगण फाउंडेशन सादर करणार आहे. त्याच दिवशी पार्थ थिएटर्स, मुंबई तर्फे पु. ल. देशपांडे लिखित ‘मॅड सखाराम’ हे नाटकही सादर करण्यात येणार आहे. (CM Devendra Fadnavis)

महिला कला महोत्सव – २ मार्च रोजी लावणी आणि शास्त्रीय गायनाची मेजवानी!

२ मार्च रोजी ‘महिला कला महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या विशेष कार्यक्रमात लावणी आणि शास्त्रीय युगलगायनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • प्रसिद्ध रेश्मा मुसळेकर आणि संच लावणी नृत्य सादर करणार आहेत.
  • विदुषी अपूर्वा गोखले आणि विदुषी पल्लवी जोशी शास्त्रीय गायन सादर करणार आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सर्व रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे. (CM Devendra Fadnavis)

नव्या संकुलामुळे कलाकारांसाठी संधी आणि प्रेक्षकांसाठी उत्तम अनुभव

नूतनीकरणामुळे कलाकारांना अधिक उत्तम आणि सुसज्ज सुविधा मिळतील. विविध सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन अधिक सहज होईल. नवोदित आणि अनुभवी कलाकारांना आपल्या कलेचा विकास करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होईल.

रवींद्र नाट्य मंदिराच्या नव्या स्वरूपामुळे मराठी रंगभूमीच्या विकासाला गती मिळेल आणि प्रेक्षकांना दर्जेदार कलाकृतींचा आनंद घेता येईल. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.