दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले Arvind Kejriwal राज्यसभेवर जाण्याच्या तयारी

59
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले Arvind Kejriwal राज्यसभेवर जाण्याच्या तयारी
  • प्रतिनिधी 

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, ‘आप’ची योजना आखल्याप्रमाणे यशस्वी झाली तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) राज्यसभेवर जावू शकतात. यासाठी योजना आखली जात असून याचा पहिला टप्पा बुधवारी यशस्वीरित्या पार पडला. पंजाबच्या लुधियाना पश्चिम या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणे आहे. या निवडणुकीसाठी ‘आप’ने बुधवारी राज्यसभेचे खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

(हेही वाचा – Pune Airport वर ३.५ कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त)

आपचे विद्यमान आमदार गुरप्रीत सिंग गोगी यांचे ११ जानेवारी रोजी निधन झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होणे आहे. ही निवडणूक 11 जुलैपूर्वी होणे आहे. आयोगाने ​निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नसला तरी आपने राज्यसभेचे खासदार संजीव अरोरा यांना बुधवारी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. यात अरोरा यांचा विजय झाला तर ते राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देतील आणि एक जागा रिक्त होईल. या जागेवर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पाठविण्याची योजना आहे.

याशिवाय, केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याऐवजी मनिष सिसोदिया यांनाही राज्यसभेवर पाठविले जावू शकते. केजरीवाल पक्षाची बांधणी करतील आणि सिसोदिया खासदार होतील अशीही चर्चा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दिल्ली सरकारने मद्य धोरण प्रकरणी कॅगचा अहवाल विधानसभेच्या पटलावर मांडला आहे. अशात, केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar आध्यात्मिक होते, पण…; गोपाळ सारंग काय म्हणाले ?)

आपचे राज्यसभेत पंजाबमधून सात राज्यसभेचे खासदार आहेत. यात राघव चढ्ढा, संदीप पाठक, क्रिकेटपटू हरभजन सिंग, शिक्षणतज्ज्ञ अशोक मित्तल, पर्यावरणवादी आणि धार्मिक नेते बाबा बलबीर सिंग सीचेवाल, उद्योजक विक्रमजीत सिंग साहनी आणि संजीव अरोरा यांचा समावेश आहे. तर दिल्लीतून नारायण दास गुप्ता, स्वाती मालिवाल आणि संजय सिंग असे तीन खासदार आहेत. आपचे राज्यसभेत एकूण 10 खासदार आहेत. (Arvind Kejriwal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.