Bihar मध्ये मंत्रिमंडळ विस्तार, भाजपाच्या ७ जणांनी घेतली शपथ

45
Bihar मध्ये मंत्रिमंडळ विस्तार, भाजपाच्या ७ जणांनी घेतली शपथ
Bihar मध्ये मंत्रिमंडळ विस्तार, भाजपाच्या ७ जणांनी घेतली शपथ

बिहारमध्ये (Bihar) दि. २६ फेब्रुवारी रोजी राज्‍य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये भाजपच्‍या ७ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्‍यात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार असल्‍याने हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे.

( हेही वाचा : Swargate Bus स्थानकातील अमानुष कृत्य; राज्यभर संतापाची लाट)

नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या मंत्रिमंडळात संजय सरावगी (Sanjay Saraogi) (दरभंगा), डॉ. सुनील कुमार (बिहारशरीफ), जिबेश कुमार (Jibesh Kumar) (जले), राजू कुमार सिंग (Raju Kumar Singh) (साहेबगंज), मोतीलाल प्रसाद (Moti Lal Prasad) (रीगा), विजय कुमार मंडल (सिक्ती) आणि कृष्ण कुमार मंटू (अमनूर) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला मी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे.

‘एक व्यक्ती, एक पद’ हे तत्व पक्षाचे काम करते. केंद्रीय नेतृत्वाने मला पक्षाच्या राज्य युनिटची जबाबदारी दिली आहे याबद्दल मी आभारी आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. सध्या बिहारमध्‍ये मंत्र्यांची संख्या 30 असून यामध्‍ये भाजपचे 15 आणि संयुक्त जनता दलाचे (जदयू) 13 तर हिंदुस्थानी अवम मोर्चा (एचएएम) एक आणि एक अपक्ष यांचा समावेश आहे. दरम्यान मंत्रिमंडळात 6 जागा रिक्त आहेत. येत्या 28 फेब्रुवारीला बिहार अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ होणार आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.