राज्यात सर्व बस स्थानकात आगार महिला दक्षता समित्या स्थापन करा; Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश

44
राज्यात सर्व बस स्थानकात आगार महिला दक्षता समित्या स्थापन करा; Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश
राज्यात सर्व बस स्थानकात आगार महिला दक्षता समित्या स्थापन करा; Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश

पुण्यातील (Pune) स्वारगेट (Swargate) एसटी स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली असता, दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीने तिला फसवून बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची तत्काळ दखल घेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe ) यांनी स्वारगेट बसस्थानक येथे संबंधित अधिकारी पुणे पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त झोन 2 श्रीमती स्मार्तना पाटील, स्वारगेट वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील, आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील यांच्याशी चर्चा करून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. यावेळी पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, महिला आघाडी संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, उपशहरप्रमुख सुधीर कुरूमकर (Sudhir Kurumkar) , सुधीर जोशी, सुरेखा पाटील, संजीवनी विजापुरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

( हेही वाचा : Bihar मध्ये मंत्रिमंडळ विस्तार, भाजपाच्या ७ जणांनी घेतली शपथ)

डॉ. गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी एसटी स्थानकांवर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्याची गरज व्यक्त केली आहे, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेत वाढ होईल. तसेच, रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही फुटेजची नियमित तपासणी आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि परिवहन आयुक्त श्री.विवेक भीमनवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्प्रिंकलर्स आणि इतर सुरक्षा उपाययोजना तात्काळ लागू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर, पीडित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली गेली आहे आणि लवकरच त्याला अटक करण्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेमुळे एसटी स्थानकांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षित व निर्भय बस स्थानके करण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Dr. Neelam Gorhe)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.