Pune : स्वारगेट बस स्थानकातील घटनेवर अजित पवार संतापले ; म्हणाले, “ताबडतोब फाशी द्या’

81
Pune : स्वारगेट बस स्थानकातील घटनेवर अजित पवार संतापले ; म्हणाले,
Pune : स्वारगेट बस स्थानकातील घटनेवर अजित पवार संतापले ; म्हणाले, "ताबडतोब फाशी द्या'

पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात (Swargate bus station) एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचार (Pune Crime) केल्याची घटना घडली. यामुळे स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी घटनेची दखल घेत, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे सांगितले आहे. (Pune)

अजित पवार यांनी एक्स पोस्ट करत म्हटले की, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. (Pune)

हेही वाचा-राज्यात सर्व बस स्थानकात आगार महिला दक्षता समित्या स्थापन करा; Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत. असे अजित पवार यांनी म्हटले. (Pune)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.