पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात (Swargate bus Depot) एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचार (Pune Crime) केल्याची घटना घडली. यामुळे स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दत्तात्रय गाडे (वय 36) या गुन्हेगाराने स्वारगेट एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) तरुणीवर अत्याचार केले होते. या पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. (Swargate bus Depot)
हेही वाचा-Pune : स्वारगेट बस स्थानकातील घटनेवर अजित पवार संतापले ; म्हणाले, “ताबडतोब फाशी द्या’
ही तरुणी पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती. ती फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने तिला हेरुन तिच्यावर अतिप्रसंग केला. या पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये दत्तात्रय गाडे याने पीडित तरुणीवर एकदा नव्हे तर दोनवेळा बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित तरुणीने मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. पोलिसांची आठ पथके दत्तात्रय गाडे याचा शोध घेत आहेत. यादरम्यान पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Swargate bus Depot)
हेही वाचा-राज्यात सर्व बस स्थानकात आगार महिला दक्षता समित्या स्थापन करा; Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश
यामध्ये आरोपीने पिडीतेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली आहे. स्वारगेट पोलीस स्थानकापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एसटी डेपोत मुलीवर दोनवेळा बलात्कार होतो आणि कोणाला पत्ताही लागत नाही, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. स्वारगेटमधील 23 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. (Swargate bus Depot)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community