Swargate Bus Depot प्रकरणातील आरोपीला पकडणाऱ्यास पोलिसांकडून १ लाखाचे बक्षीस

65
Swargate Bus Depot प्रकरणातील आरोपीला पकडणाऱ्यास पोलिसांकडून १ लाखाचे बक्षीस
Swargate Bus Depot प्रकरणातील आरोपीला पकडणाऱ्यास पोलिसांकडून १ लाखाचे बक्षीस

पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात (Swargate bus Depot) एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचार (Pune Crime) केल्याची घटना घडली. यामुळे स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) (वय 36) या गुन्हेगाराने स्वारगेट एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) तरुणीवर अत्याचार केले आणि नंतर पसार झाला.

आरोपीला पकडण्यासाठी पुणेपोलिसांनी आठ पथके तयार केली असून, त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे. पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे (Dattatray Gade) याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Swargate Bus Depot तील प्रकरणात तरुणीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड)

पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी कुठल्याही संशयित हालचाली आढळल्यास स्वारगेट पोलीस ठाण्याशी किंवा १०० क्रमांकावर संपर्क साधावा. अशा सूचनाही देण्यात आली आहे.

या पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. ही तरुणी पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती. ती फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने तिला हेरुन तिच्यावर अतिप्रसंग केला. या पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने पीडित तरुणीवर एकदा नव्हे तर दोनवेळा बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित तरुणीने मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. पोलिसांची आठ पथके दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याचा शोध घेत आहेत. यादरम्यान पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Swargate bus Depot)

यामध्ये आरोपीने पिडीतेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली आहे. स्वारगेट पोलीस स्थानकापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एसटी डेपोत मुलीवर दोनवेळा बलात्कार होतो आणि कोणाला पत्ताही लागत नाही, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. स्वारगेटमधील 23 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. (Swargate bus Depot)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.