Telangana tunnel accident : बोगद्यात अडकलेल्या ८ कामगारांच्या बचावकार्यात आता श्वानपथकाची मदत

52
Telangana tunnel accident : बोगद्यात अडकलेल्या ८ कामगारांच्या बचावकार्यात आता श्वानपथकाची मदत
Telangana tunnel accident : बोगद्यात अडकलेल्या ८ कामगारांच्या बचावकार्यात आता श्वानपथकाची मदत

तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल (SLBC) गेल्या शनिवारपासून बोगद्यात (Telangana tunnel accident)अडकलेल्या ८ कामगारांना बाहेर काढण्याचे (Telangana Tunnel) प्रयत्न सुरू आहेत. कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी शेकडो बचाव कर्मचारी कठोर परिश्रम करत आहेत. आता या कामगारांना बाहेर काढण्यासाठी श्वानपथकाची मदत घेण्याचा निर्णय बचाव पथकांनी घेतला आहे. (Telangana tunnel accident)

हेही वाचा-Manipur Violence : मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात ! स्थानिक लोकांनी १०४ विविध प्रकारची शस्त्रे पोलिसांना केली सुपूर्द

बोगद्यात अडकलेल्या ८ कामगारांना बाहेर काढण्यासाठी श्वानपथकाची मदत घेणार असल्याचे जिल्हाधिकारी बी. संतोष यांनी सांगितले आहे. ५८४ जणांची टीम बचाव कार्यात गुंतली आहे. यामध्ये आर्मी, नेव्ही, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयआयटी चेन्नई आणि एल अँड टी कंपनीचे तज्ज्ञ समाविष्ट आहेत. परंतु अद्यापपर्यंत अडकलेल्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही. (Telangana tunnel accident)

हेही वाचा-Pune : स्वारगेट बस स्थानकातील घटनेवर अजित पवार संतापले ; म्हणाले, “ताबडतोब फाशी द्या’

बचाव पथकाने रविवारीच बचाव कार्य सुरू केले होते. बचाव पथकाने बोगद्यातील अपघात स्थळाची पाहणी केली. आत जाण्याचा कोणताही मार्ग नसल्याने टीम परत आली. ५२ जणांनी आपले प्राण वाचवले, परंतु टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) चालवणारे ८ कामगार आत अडकले. त्यामध्ये २ अभियंते, २ मशीन ऑपरेटर आणि ४ मजूर आहेत. (Telangana tunnel accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.