पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात (Swargate bus Depot) एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचार (Pune Crime) केल्याची घटना घडली. दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) (वय 36) या गुन्हेगाराने स्वारगेट एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) तरुणीवर अत्याचार केले आणि नंतर पसार झाला. दुसरा दिवस उजाडण्यापूर्वीच स्वारगेट आगार प्रशासनाने ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाले ती बस अज्ञातस्थळी हलवली आहे. (Swargate bus Depot)
शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली
स्वारगेट आगारातील ही शिवशाही बस काहीजणांकडून फोडण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवण्यात आली आहे. बलात्कार प्रकरणाच्या अनुषंगाने या बसमध्ये महत्त्वाचे पुरावे असू शकतात, त्यामुळे ही बस अन्यत्र ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून या शिवशाही बसच्या ठावठिकाण्याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. पोलिसांना बसमध्ये दत्तात्रय गाडेचा बूट मिळाला आहे. (Swargate bus Depot)
आरोपीकडे मोबाईल फोन नाही
दत्तात्रय गाडे अत्याचार केल्यानंतर पुण्यातील किंवा शिरुरच्या त्याच्या घरी गेला नव्हता. पोलिसांकडून दत्तात्रय गाडे याच्या भावाची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्याने दत्तात्रय गाडे घरी आला नसल्याचे सांगितले. दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी खूप काळजी घेत आहे. दत्तात्रय गाडे याच्याकडे मोबाईल फोन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गाडे याचे लोकेशन ट्रॅक करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या घटनेला 48 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना दत्तात्रय गाडे याला शोधून काढता आलेले नाही. त्यामुळे पुणे पोलिसांवर सध्या प्रचंड दबाव आहे. (Swargate bus Depot)
पकडून देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस
कालपर्यंत दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची 8 पथके कार्यरत होती. मात्र, आता या पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरुणीवरील अत्याचाराला 48 तास उलटून गेल्यानंतरही दत्तात्रय गाडे फरार आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दत्तात्रय गाडे याला पकडण्यात यश येईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 7 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. (Swargate bus Depot)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community