पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात (Swargate bus Depot) एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचार (Pune Crime) केल्याची घटना घडली. दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) (वय 36) या गुन्हेगाराने स्वारगेट एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) तरुणीवर अत्याचार केले आणि नंतर पसार झाला. या प्रकारानंतर गृहराज्य मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी गुरुवारी स्वारगेट एसटी आगार आणि पोलीस ठाण्याला भेट दिली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे लवकरच पकडला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. (Swargate bus Depot)
हेही वाचा-रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw पोहोचले प्रयागराज जंक्शनला ; अधिकाऱ्यांचे मानले आभार
योगेश कदम महत्त्वाची माहिती देताना म्हणाले, “स्वारगेट एसटी आगारात तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी पोलिसांनी बाहेर येणार नाही, याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली होती. ही बातमी बाहेर आली असतील तर कदाचित आपल्याला आरोपीचे आता जे संभाव्य लोकेशन मिळाले आहे, ते मिळू शकले नसते. ही बातमी बाहेर आली असती तर आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा सावध होऊन लांब पळून गेला असता. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. केवळ गुप्तता बाळगण्यात आली होती.” असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिले. (Swargate bus Depot)
पुढे ते म्हणाले, “पुणे शहरात जी घटना घडली आहे ती बस स्टँडच्या आवारात घडली आहे. पोलिसांनी रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत गस्त कितीवेळा घातली गेली याचीही माहिती मी घेतली आहे. पीआयही रात्री दीड वाजता गेले होते, त्यानंतर टीमसह तीन वाजताही तिथे होते. पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नव्हता. आरोपीवर भुरट्या चोरीचे गुन्हे दाखल आहे. मात्र ते ग्रामीण भागातल्या पोलीस ठाण्यात आहे. पुणे शहरात जे आरोपी आहेत त्यांच्याकडे पोलीस लक्ष ठेवून असतात. त्यांचं रेकॉर्ड पोलिसांकडे असतं. जे ग्रामीण भागातून येतात त्यांचा रेकॉर्ड नसतो. पुणे शहरात सीसीटीव्ही आणखी मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४३७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. आपण त्या दृष्टीनेही काम करतो आहे.” (Swargate bus Depot)
हेही वाचा- Telangana tunnel accident : बोगद्यात अडकलेल्या ८ कामगारांच्या बचावकार्यात आता श्वानपथकाची मदत
परवा स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल कृती झाली नाही. ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 लोक होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कोणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. आता आरोपी ताब्यात आल्यावर आणखी गोष्टी स्पष्ट होतील, असे योगेश कदम यांनी म्हटले आहे. (Swargate bus Depot)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community