
1 of 7

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने प्रवेश केला आहे आणि टीम इंडिया आपला पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) खेळण्याठी सज्ज झाली आहे. हा सामना 2 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. (ICC Champions Trophy 2025)

यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली असून बुधवारी (२६ फेब्रुवारी )रात्री संघाने नेटवर सराव केला, परंतु या सरावा दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि उपकर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) दिसले नाहीत. (ICC Champions Trophy 2025)

क्रिकबझच्या मते, शुभमन गिल आजारी आहे आणि त्यामुळे तो सरावाला येऊ शकला नाही. (ICC Champions Trophy 2025)

रोहित सरावासाठी का आला नाही, याबद्दल अधिकृत विधान नसले तरी, रविवारी (23 फेब्रुवारी) पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या दुसऱ्या लीग सामन्यादरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीतून तो अजूनही बरा झाला नाही असे म्हटले जात आहे. पाकिस्तानच्या डावादरम्यान तो काही काळ ड्रेसिंग रूममध्ये गेला पण नंतर तो मैदानात परतला. (ICC Champions Trophy 2025)

2 मार्चपूर्वी त्याला कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून रोहित त्याच्या दुखापतीबद्दल सावधगिरी बाळगत असल्याचे मानले जाते. (ICC Champions Trophy 2025)