शिवसेना उबाठाला Shiv Sena कडून कोल्हापूरमध्ये ‘दे धक्का’

शिवसेना उबाठाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि मनसेचे गजानन जाधव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा घेत पक्षप्रवेश

95
शिवसेना उबाठाला Shiv Sena कडून कोल्हापूरमध्ये ‘दे धक्का’
  • प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना उबाठाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) हातकणंगले जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात डॉ. मिणचेकर आणि गजानन जाधव यांनी शिवसेनेचा (Shiv Sena) भगवा हाती घेतला. या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असून पक्ष अधिक भक्कम होईल, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

(हेही वाचा – Marathi Bhasha Gaurav Din 2025 : २७ फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन की मराठी राजभाषा दिन?)

शिवसेनेला कोल्हापुरात अधिक बळकटी

पक्षप्रवेशानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व १० आमदारांचा विजय झाला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शिवसेनेला (Shiv Sena) मोठा विजय मिळावा, यासाठी डॉ. मिणचेकर आणि गजानन जाधव महत्त्वाची भूमिका बजावतील.”

पक्षप्रवेश सोहळ्याला नेत्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, तसेच हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरात शिवसेना उबाठाला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकांसाठी ही शिवसेनेसाठी (Shiv Sena) महत्त्वाची घडामोड ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.