महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी IPS अधिकारी नियुक्त करण्यात येणार; Pratap Sarnaik यांची माहिती

47
महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी IPS अधिकारी नियुक्त करण्यात येणार; Pratap Sarnaik यांची माहिती
  • प्रतिनिधी

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला सुरक्षेबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेतली. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्णय

परिवहनमंत्र्यांनी बस स्थानकांची सुरक्षा वाढवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले. २७०० सुरक्षा रक्षक तिन्ही एजन्सींमधून नियुक्त करण्यात आले असून त्यांची संख्या आणखी वाढवण्याची मागणी केली जाणार आहे. २२५ बसस्थानकांची सुरक्षा ऑडिट करण्यात येणार असून एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षेचा दर्जा उंचावला जाणार आहे.

बंद बसेस आणि कार भंगारात काढण्याचे आदेश देण्यात आले असून दीड महिन्यात त्या हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली असून पुढील काळात सर्व बस स्थानकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. (Pratap Sarnaik)

(हेही वाचा – २७ फेब्रुवारी : ‘फ्लिकर सिंह’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या हॉकीपटू Sandeep Singh यांचा जीवन परिचय)

सुरक्षेसाठी IPS अधिकाऱ्यांची नेमणूक

महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक वरिष्ठ IPS अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. (Pratap Sarnaik)

महिला प्रवाशांसाठी सरकारचा आश्वासक संदेश

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, “ही घटना दुर्दैवी आहे आणि आम्ही त्याची जबाबदारी झटकलेली नाही. महिलांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. त्यामुळे प्रवासी महिला निर्भय आणि निश्चिंतपणे प्रवास करू शकतील यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत.” महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.