ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी; DCM Eknath Shinde यांचे निर्देश

44
ग्रामीण भागात ‘हर घर जल’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी; DCM Eknath Shinde यांचे निर्देश
  • प्रतिनिधी

राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा तसेच शाश्वत स्वच्छतेसह ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दिले. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प हा मराठवाड्याच्या दुष्काळ निर्मूलनासाठी महत्वाकांक्षी असून, त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक

सह्याद्री अतिथीगृह येथे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Marathi Bhasha Din च्या निमित्ताने ‘गुणीजनां’नी जागवल्या वीर सावरकरांच्या आठवणी)

८० लाख कुटुंबांना लाभ – उर्वरितांसाठी तातडीने कार्यवाहीचे निर्देश

राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत २० हजार घरांना थेट नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, त्यामुळे ८० लाख कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. मात्र, उर्वरित घरांना त्वरित नळजोडणीसाठी कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दिले.

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी केंद्राकडून निधी मिळवणार

मराठवाड्याच्या दुष्काळ निर्मूलनासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची आहे. हा प्रकल्प केंद्राच्या विशेष योजनेंतर्गत आणून त्यासाठी विशेष निधी मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली.

(हेही वाचा – पुण्यातील घटनेनंतर सरकार अलर्ट मोडवर; मंत्री Pratap Sarnaik यांनी एसटी महामंडळाला दिले ‘हे’ निर्देश)

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण – टप्पा दोनचा आढावा

बैठकीत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक शौचालयांबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीवर भर द्यावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) दिले. १०० दिवसांच्या उपक्रमांतर्गत ‘हर घर जल’ योजनेत १०० टक्के नळजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.

शाळा व अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के नळजोडणी

ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी बैठकीत दिले.

राज्यातील पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबवून, ‘हर घर जल’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.