राज्यात प्राध्यापक भरतीला मंजुरी, नवीन कार्यपद्धती लागू; Chandrakant Patil यांची माहिती

63
राज्यात प्राध्यापक भरतीला मंजुरी, नवीन कार्यपद्धती लागू; Chandrakant Patil यांची माहिती
  • प्रतिनिधी

राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीला मान्यता देण्यात आली असून, भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी नवीन कार्यपद्धती लागू करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ही माहिती दिली.

राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यात शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनाला ८०% आणि मुलाखतीसाठी २०% गुण राखीव ठेवण्यात आले आहेत. १०० पैकी किमान ५० गुण मिळवणारे उमेदवार अंतिम निवडीसाठी पात्र ठरणार आहेत.

(हेही वाचा – शिवसेना उबाठाला Shiv Sena कडून कोल्हापूरमध्ये ‘दे धक्का’)

निवड प्रक्रियेत परिसंवाद, व्याख्यान प्रात्यक्षिके, अध्यापन कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असेल. निवड समितीच्या बैठकीचे दृक-श्राव्य चित्रिकरण केले जाईल आणि सीलबंद करून सुरक्षित ठेवले जाईल. मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला जाईल. (Chandrakant Patil)

सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियांना नवीन नियमांच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली असून, भविष्यातही हीच कार्यपद्धती सर्व विद्यापीठांमध्ये लागू राहील. त्यामुळे गुणवत्ताधारित भरती प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक होईल, तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.