महाकुंभमेळ्याची सांगता होताच PM Narendra Modi यांनी पोस्ट लिहीत का मागितली माफी?

95
महाकुंभमेळ्याची सांगता होताच PM Narendra Modi यांनी पोस्ट लिहीत का मागितली माफी?
महाकुंभमेळ्याची सांगता होताच PM Narendra Modi यांनी पोस्ट लिहीत का मागितली माफी?

महाकुंभमेळ्याची (Mahakumbh) नुकतीच सांगता झाली असुन जगभरातील कोट्यवधी भाविकांनी श्रद्धेने आणि भक्तीने त्रिवेणी संगमात स्नान केले. मुख्यमंत्री योगींनी देखील सांगता होताच सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सोशल पोस्ट लिहीत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, ‘महाकुंभ संपन्न झाला… एकतेचा महायज्ञ संपन्न झाला.’ प्रयागराजमधील (Prayagraj) ४५ दिवस चाललेल्या एकतेच्या महाकुंभात १४० कोटी देशवासीय ज्या पद्धतीने एकाच वेळी एकत्र आले, ते सर्वोत्तम होते. मला माहिती आहे, इतका मोठा कार्यक्रम आयोजित करणे सोपे नव्हते. मी गंगा माता, यमुना माता, सरस्वती माता यांना प्रार्थना करतो, हे माते, जर आमच्या उपासनेत काही कमतरता असेल तर मला क्षमा करा. जर मी भक्तांची सेवा करण्यात कमी पडलो असेल, तर माझ्यासाठी देवाचे रूप असलेल्या जनतेचीही माफी मागतो.’ (PM Narendra Modi)

हेही वाचा-Swargate Bus Depot : स्वारगेटचा नराधम ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात

‘प्रयागराजमध्ये आयोजित केलेला हा महाकुंभमेळा आधुनिक काळातील मॅनेटमेंट प्रोफेशनल्ससाठी, नियोजन आणि धोरण तज्ञांसाठी अभ्यासाचा नवीन विषय बनला आहे. आज, संपूर्ण जगात कुठेही इतक्या मोठ्या कार्यक्रमाची तुलना होऊ शकत नाही, असे दुसरे कोणतेही उदाहरण नाही. त्रिवेणी संगमात एकाच नदीकाठी इतक्या मोठ्या संख्येने, कोटींच्या संख्येने लोक कसे जमले हे पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे.’ (PM Narendra Modi)

हेही वाचा-विस्तारित Coastal Road तसेच मढ आणि वर्सोवा पुलामुळे बाधित कांदळवनाचे चंद्रपुरात पर्यायी वनीकरण

पोस्टच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लिहिले की, “कल्पनेपेक्षा खूप जास्त संख्येने भाविक प्रयागराजला आले होते. प्रशासनानेही मागील कुंभमेळ्यातील अनुभवांवर हा अंदाज लावला होता. अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जवळजवळ दुप्पट भाविकांनी एकतेच्या या महाकुंभात भाग घेतला आणि पवित्र स्नान घेतले. जर आध्यात्मिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या लोकांनी कोट्यवधी भारतीयांच्या या उत्सवाचा अभ्यास केला तर त्यांना आढळेल की, आपल्या वारशाचा अभिमान असलेला भारत आता एका नवीन उर्जेने पुढे जात आहे. मला वाटतं, हा युग बदलाचा आवाज आहे, जो भारताचे नवे भविष्य लिहिणार आहे.” असं पंतप्रधानांनी म्हटले आहे. (PM Narendra Modi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.