
-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत उपान्त्य फेरी तर गाठलीय. पण, आता न्यूझीलंड विरुद्धचा मुकाबला हा वर्चस्वाची लढाई आहे. कारण, त्यातूनच ठरेल ए गटात अव्वल संघ कुठला असेल तो. आणि अव्वल संघाला बी गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी खेळावं लागेल. मूळातच भारतीय संघ इथून पुढे कुठलाही सामना हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. त्या दृष्टीनेच संघाची मोर्चेबांधणी सध्या सुरू आहे. (Champions Trophy, Ind vs NZ)
भारतीय संघातील वातावरण मात्र हलकं आणि खेळीमेळीचं आहे. दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना ७ दिवसांची विश्रांती मिळाली आहे. सरावा दरम्यान खेळाडू क्रिकेटबरोबरच फुटबॉल खेळताना दिसले. आयसीसी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर संघाचा सराव सुरू आहे. आणि दर दोन दिवसांच्या सरावानंतर एक सत्र हे खेळाडूंसाठी ऐच्छिक ठेवण्यात आलं आहे. गुरुवारी खेळाडूंनी क्रिकेटला सुरुवात करण्यापूर्वी फुटबॉलचा आनंद लुटला. (Champions Trophy, Ind vs NZ)
(हेही वाचा – महाकुंभमेळ्याची सांगता होताच PM Narendra Modi यांनी पोस्ट लिहीत का मागितली माफी?)
📸📸 Prepping 🆙 for #NZvIND 👌👌#TeamIndia | #ChampionsTrophy pic.twitter.com/YpL0V6aCKw
— BCCI (@BCCI) February 27, 2025
आणि यात विराट कोहलीच (Virat Kohli) सगळ्यात पुढे होता. पाकिस्तानविरुद्ध नाबाद १०० धावा करत विराटने आपण फॉर्ममध्ये परतल्याची ग्वाही दिली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचं हे ५१ वं शतक होतं. शिवाय सर्वात जलद १४,००० एकदिवसीय धावा पूर्ण करण्याचा विक्रमही त्याने केला. आता न्यूझीलंडविरुद्धही मोठी खेळी करण्याचा त्याचा मानस असेल. तर भारतीय संघासाठी आणखी एक खुशखबर म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant) तापातून उठला आहे. आणि त्यानेही गुरुवारी दीर्घ काळ फलंदाजीचा सराव केला.
(हेही वाचा – LAC सीमारेषेवरून चीनचे मोठे विधान, Ladakh सीमेवरील… )
Smiles 🔛
Energy levels high 😎Raw 🔊 moments from #TeamIndia‘s training session ahead of the match against New Zealand 👌👌
WATCH 🎥🔽 #ChampionsTrophy | #INDvNZhttps://t.co/zH6nwdzah4
— BCCI (@BCCI) February 27, 2025
उपकर्णधार शुभमन गिलही (Shubman Gill) फलंदाजीचा सराव करताना दिसला. भारतीय संघासाठी सुटीचा दिवस असतानाही शुभमनने फलंदाजीच्या सरावात खंड पडू दिलेला नाही. तो दररोज खाजगी नेट्समध्ये सराव करताना दिसत आहे. इतर भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये असताना शुभमन थ्रो-डाऊन तज्जांबरोबर दुबई क्रिकेट अकादमीत सराव करताना दिसत आहे. शुभमन या स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आणि सलामीच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने शतक झळकावलं आहे. तर पाकिस्तानविरुद्घही त्याने मौल्यवान ४५ धावा केल्या होत्या. (Champions Trophy, Ind vs NZ)
भारतीय संघाचा पुढील सामना येत्या २ मार्चला न्यूझीलंडबरोबर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community