स्वारगेट बलात्कार (Pune Rape Case) प्रकरणाने (Swargate Bus Depot) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणावर भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा-Swargate Bus Depot : स्वारगेटचा नराधम ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात
डी. वाय चंद्रचूड (D. Y. Chandrachud) म्हणाले, “आपल्याकडे विशेषतः निर्भया बलात्कार प्रकरण झाल्यानंतर कायद्यात अनेक बदल करण्यात आले. फक्त कायद्याच्या माध्यमातूनच आपण अशा घटना कमी करू शकत नाहीत, कायद्याशिवायही समाजावर देखील मोठी जबाबदारी आहे आणि कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. समाजात मोठ्या प्रमाणात महिला नोकरी, शिक्षणासाठी घरापासून दूर जाऊन काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येक स्तरावर महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे, जेणेकरून महिला जेथे कुठे जातील तेथे त्यांना सुरक्षित वाटेल.” (D. Y. Chandrachud)
हेही वाचा-महाराष्ट्र-मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या जंगलातील Naxal Activities थंडावल्या
“असे उदाहरण समोर आल्यानंतर त्याच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करणे , योग्य पद्धतीने तपास होणे, लवकरात लवकर सुनावणी होऊन शिक्षा होणे हे खूप गरजेचे आहे. न्यायव्यवस्था आणि पोलिसांची यामध्ये मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक स्तरावर आपण यावर लक्ष देऊन विचार केला पाहिजे, जेणेकरून आपण एक नवीन समाजाकडे पुढे जाऊ शकू, जेथे आपल्या समाजातील अर्धा हिस्सा असलेल्या महिला सुरक्षितपणे नोकरी, शिक्षण अशी प्रत्येक गोष्ट करू शकतील.” असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. (D. Y. Chandrachud)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community