Champions Trophy : भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल भारतीय संघात परतले

घरगुती कारणांमुळे इंग्लंडविरुद्घच्या मालिकेदरम्यान ते घरी परतले होते.

42
Champions Trophy : भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल भारतीय संघात परतले
Champions Trophy : भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल भारतीय संघात परतले
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) बुधवारी उशिरा भारतीय संघात परतले आहेत. बुधवारी खेळाडूंना सरावासाठी सुटी होती. पण, गुरुवारी मॉर्केल संघाबरोबर दुबई क्रिकेट अकादमीत एकत्र दिसले. भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी (Champions Trophy) दुबईला पोहोचल्यानंतर काही तासांतच घरगुती महत्त्वाच्या कारणामुळे मॉर्केल मायदेशी परतले होते. १७ फेब्रुवारीपासून भारतीय संघाच्या सरावसत्रांमध्ये त्यांनी भाग घेतला नव्हता.

पण, गुरुवारी ते भारतीय संघाबरोबर पुन्हा एकदा दिसले. मॉर्केल (Morne Morkel) यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर (Abhishek Nayar) यांनी भारतीय गोलंदाजांना मार्गदर्शन केलं. भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) चांगल्या फॉर्ममध्ये असून पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने वर्चस्व राखत जिंकले आहेत.

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांना मोठा धक्का ; सहा नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार)

पहिल्या सामन्यात बांगलादेशचा भारताने ४ गडी राखून पराभव केला. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा भारताने ६ गडी आणि ४५ चेंडू राखून धुव्वा उडवला. दोन्ही सामन्यांत भारताकडून अनुक्रमे शुभमन गिल (Shubman Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी शतकं झळकावली. तर गोलंदाजीत मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि कुलदीप यादव चमकले.

भारतीय संघ आता पुढील सामना येत्या २ मार्चला दुबईतच न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. सध्या दोन्ही संघांचे प्रत्येकी ४ गुण झाले आहेत. आणि संघांनी उपान्त्य फेरी गाठली आहे. पण, सरस धावगतीच्या आधारे न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अव्वल आहे. त्यामुळे २ मार्चचा मुकाबला ही वर्चस्वाची लढाई असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.