Earthquake : 3 तासांत भारतासह नेपाळ, पाकिस्तान, तिबेटची जमीन भूकंपाने हादरली

75
Earthquake : 3 तासांत भारतासह नेपाळ, पाकिस्तान, तिबेटची जमीन भूकंपाने हादरली
Earthquake : 3 तासांत भारतासह नेपाळ, पाकिस्तान, तिबेटची जमीन भूकंपाने हादरली

भारतासह (India) चार देशांमध्ये भूकंपाने (Earthquake) जमीन हादरली आहे. अवघ्या तीन तासांत भारत, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानच्या अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भारतातील पटना येथील लोकांना आज (28 फेब्रुवारी) पहाटे 2.35 वाजता भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले, त्यानंतर लोक घराबाहेर पडले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.5 इतकी नोंदवण्यात आली. (Earthquake)

हेही वाचा-पुण्यातील बलात्कार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश D. Y. Chandrachud काय म्हणाले ?

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे 2.35 वाजता नेपाळच्या (Nepal) बागमती प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळचा बागमती प्रांत बिहारमधील मुझफ्फरपूरच्या उत्तरेस 189 किलोमीटर अंतरावर आहे. या भूकंपात अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. या भूकंपाचे धक्के नेपाळमध्येच नव्हे तर शेजारील तिबेटमध्येही (Tibet) जाणवले. (Earthquake)

हेही वाचा-महाराष्ट्र-मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या जंगलातील Naxal Activities थंडावल्या

त्याचवेळी पाकिस्तानातही (Pakistan) पहाटे 5.14 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी होती. यापूर्वी 16 फेब्रुवारीलाही पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू रावळपिंडीपासून आठ किलोमीटर दक्षिण-पूर्वेला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून 70 किलोमीटर खोलीवर होता. (Earthquake)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.