देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल : Nitesh Rane

57
देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल : Nitesh Rane
देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल : Nitesh Rane

वाढवण बंदर (vadhavan port project) महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या (Economic development) दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊन म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले.

हेही वाचा-Earthquake : 3 तासांत भारतासह नेपाळ, पाकिस्तान, तिबेटची जमीन भूकंपाने हादरली

वाढवण बंदराच्या विकास प्रकल्पाची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आयोजित करण्यात आली होती. राणे पुढे म्हणाले, वाढवण बंदरामध्ये महाराष्ट्र शासनाचा 26 टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाचा केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे राणे यांनी सांगितले. (Nitesh Rane)

हेही वाचा-Uddhav Thackeray यांना मोठा धक्का ; सहा नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्यामार्फत स्थानिकांना विविध क्षेत्रातील कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. (Nitesh Rane)

हेही वाचा-महाकुंभमेळ्याची सांगता होताच PM Narendra Modi यांनी पोस्ट लिहीत का मागितली माफी?

वाढवण बंदरामुळे मोठा रोजगार निर्माण होणार आहे तो पालघर जिल्हयातील स्थानिकांना मिळायला पाहिजे. स्थानिक मच्छिमारांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांची भावी पिढी या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभी राहिल व आर्थिक सक्षम होइल. त्याबाबत संबंधितांना प्रशिक्षण देऊन वाढवण बंदराच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचा विकास आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार असून यासाठी प्रकल्प उभारणीच्या कामात संबंधित अधिकारी यांनी जलदगतीने काम करावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (Nitesh Rane)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.