SEBI New President : तुहिन कांता पांडे नवीन सेबी अध्यक्ष, कोण आहेत तुहिन पांडे?

माधवी पुरी-बूच यांच्यानंतर तर सेबीचा कारभार हातात घेतली.

59
SEBI New President : तुहिन कांता पांडे नवीन सेबी अध्यक्ष, कोण आहेत तुहिन पांडे?
SEBI New President : तुहिन कांता पांडे नवीन सेबी अध्यक्ष, कोण आहेत तुहिन पांडे?
  • ऋजुता लुकतुके

सध्याचे अर्थसचिव तुहिन कांता पांडे (Tuhin Pandey) यांची नवे सेबी अध्यक्ष (SEBI New President) म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्याच्या अध्यक्ष माधवी पुरी – बुच (Madhabi Puri Buch) यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपत आहे. त्यानंतर १ मार्चपासून तुहिन हे पदभार स्वीकारतील. ते १९८७ चे आयएएस अधिकारी असून ओडिशा केडरचे आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पांडे यांच्या नेमणुकीला संमती दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची नेट्समध्ये गोलंदाजी सुरू, नेटकऱ्यांचा आग्रह उपान्त्य फेरीत खेळण्याचा)

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पांडे यांची अर्थसचिव म्हणून नेमणूक झाली होती. आधीचे सचिव टीव्ही सोमनाथन (T. V. Somanathan) यांची कॅबिनेट सचिव म्हणून पदोन्नती झाल्यानंतर पांडे यांची महसूल खात्यात अर्थसचिव म्हणून वर्णी लागली होती. आता पाचच महिन्यांत त्यांची सेबीचे अध्यक्ष म्हणून बदली झाली आहे. पांडे यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात स्नातकोत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी एमबीए अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. (SEBI New President)

(हेही वाचा – Mumbai Crime : रस्त्यावर थुंकल्याचा दंड ४० हजार, तोतया पोलीस अधिकारी जाळ्यात)

आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते सुरुवातीला ओडिशा राज्यसरकारचे मुख्य सचिव होते. त्यानंतर नीती आयोगाचे संयुक्त सचिव तसंच वाणिज्य मंत्रालयाचे उपसचिव अशा जबाबदाऱ्याही त्यांनी पेलल्या आहेत. अगदी अलीकडे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट या केंद्रसरकारने स्थापन केलेल्या महत्त्वाच्या विभागाचे ते सचिव होते. २०१९ मध्ये ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर एअर इंडियाच्या खाजगीकरणाची महत्त्वाची प्रक्रिया यांनी पार पाडली होती. इतकंच नाही तर एलआयसीमध्ये (LIC) परकीय गुंतवणूक स्वीकारण्याचा महत्त्वाचा निर्णय आणि अंमलबजावणीही त्यांच्याच काळात झाली. (SEBI New President)

ओडिशा राज्यात कार्यरत असताना त्यांनी आरोग्य, सामान्य प्रशासन विभाग, व्यावसायिक कर, वाहतूक व वित्त विभागात महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. ओडिशा स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन व ओडिशा स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. सेबीच्या मावळत्या अध्यक्ष माधवी पुरी बुच (Madhabi Puri Buch) यांच्यावर अदानी समुहाशी साटंलोटं असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे मलीन झालेली सेबीची प्रतिमा सुधारण्याचं आव्हान आता पांडे यांच्यासमोर असेल. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. (SEBI New President)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.