itbp : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस म्हणजेच ITBP यांना किती असतो पगार, माहितीय का?

31
itbp : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस म्हणजेच ITBP यांना किती असतो पगार, माहितीय का?

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस म्हणजेच ITBP हे भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे म्हणजे CAPF चा एक महत्त्वाचा घटक आहे. ITBP यांचं काम देशाच्या सीमा सुरक्षित करणं आणि आपत्कालीन परिस्थितीत ऑपरेशन्स हाताळणे आहे. जर तुम्ही ITBP मध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल, तर कॉन्स्टेबलचा पगार किती असतो, भत्ते कोणते मिळतात आणि त्यांचं काय काम असतं हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. (itbp)

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला ITBP कॉन्स्टेबलचा पगार, हातात येणारा पगार, नोकरीचे फायदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांचे सर्व पैलू व्यवस्थित उलगडून सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात.. (itbp)

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची नेट्समध्ये गोलंदाजी सुरू, नेटकऱ्यांचा आग्रह उपान्त्य फेरीत खेळण्याचा)

ITBP कॉन्स्टेबलचं पद आणि पगार पुढीलप्रमाणे असतो : 
  • पे स्केल –
    ₹२१,७०० ते ₹६९,१०० (७व्या सीपीसी अंतर्गत लेव्हल-३ पे मॅट्रिक्स)
  • ग्रेड पे –
    ₹२,०००
  • इन-हँड सॅलरी –
    ₹३१,००० ते ₹३६,००० (सर्व भत्त्यांसह)
  • भत्ते –
    डीए, एचआरए, टीए, विशेष भरपाई भत्ता, रेशनसाठी पैसे आणि बरंच काही
  • कॉन्स्टेबलच्या जबाबदार्‍या – सीमेची सुरक्षा करणं, गस्त घालणं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य तो प्रतिसाद देणं, अंतर्गत सुरक्षा करणं आणि नव्या कॉन्स्टेबल्सना प्रशिक्षण देणं इत्यादी

ITBP कॉन्स्टेबलचा पगार आणि त्यांना मिळणारे फायदे हे देशाची सेवा करण्याची आवड असलेल्या तरुणांसाठी एक आकर्षक करिअर करण्याचा मार्ग आहे. इथे मिळणारा पगार, व्यापक भत्ते आणि करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी म्हणजे ITBP मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक फायदेशीर करिअर घडवण्याची संधी आहे. त्यासाठी नोकरीचं प्रोफाइल समजून घेऊन, नोकरी मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे तयारी करून, तुम्ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित सैन्यांपैकी एका विभागामध्ये परिपूर्ण करिअर घडवू शकता. (itbp)

(हेही वाचा – Maharashtra CMO : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची पाकिस्तानी नंबरवरून धमकी)

ITBP कॉन्स्टेबल पगार संरचना

ITBP कॉन्स्टेबलचा पगार हा ७व्या वेतन आयोगाच्या लेव्हल-३ च्या पे मॅट्रिक्सवर आधारित आहे. त्यामुळे स्पर्धात्मक वेतन आणि वेगवेगळे भत्ते मिळतील याची खात्री असते. पगाराच्या घटकांचं तपशीलवार विश्लेषण खाली दिलं आहे:

  • मूळ वेतन : दर महिन्याला ₹२१,७००
  • पगाराची श्रेणी : ₹२१,७०० ते ₹६९,१००
  • ग्रेड पगार : ₹२,०००
भत्ते

ITBP कॉन्स्टेबलला अनेक भत्ते मिळतात. त्यामुळे त्यांना मिळणार्‍या मूळ पगारात वाढ होते. जसं की, (itbp)

  • महागाई भत्ता (DA) : हा भत्ता मूळ पगाराच्या टक्केवारीने मोजला जातो. सध्या तो ४२% एवढा आहे. म्हणजे दरमहा अंदाजे पगारामध्ये ₹९,११४ जोडले जातात.
  • घरभाडे भत्ता (HRA) : हा भत्ता पोस्टिंगच्या स्थानानुसार मूळ वेतनाच्या ८% ते २७% पर्यंत दिला जातो. जसं की मोठ्या शहरांमध्ये दर महिन्याला ₹५,८५९ पर्यंत रक्कम मिळू शकते.
  • वाहतूक भत्ता (TA) : दर महिन्याला ₹२,००० ते ₹४,५०० पर्यंतचा भत्ता प्रवास खर्चासाठी दिला जातो.
  • विशेष भरपाई भत्ता : हा भत्ता काम करण्यास कठीण असलेल्या प्रदेशात आणि जास्त जोखीम असलेल्या विभागात पोस्टिंगसाठी दिला जातो.
  • रेशन भत्ता : या भत्त्यामध्ये दररोज लागणार्‍या अन्नाच्या खर्चाचा समावेश असतो. त्यासाठी दर महिन्याला अंदाजे ₹४,००० दिले जातात.
  • गणवेश भत्ता : आपल्या गणवेशाची निगा राखण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी हा भत्ता दिला जातो.
  • वैद्यकीय भत्ता : यामध्ये ITBP कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य सुविधा दिली जाते. (itbp)
ITBP कॉन्स्टेबलचा हातात येणारा पगार

सगळे भत्ते आणि मानक कपाती जसं की, पेन्शन योगदान आणि कर यांचा हिशेब केल्यानंतर ITBP कॉन्स्टेबलला मिळणारा पगार दर महिन्याला साधारणपणे ₹३१,००० ते ₹३६,००० एवढा असतो. पण तरीही पगाराची नेमकी संख्या त्यांच्या पोस्टिंगचं ठिकाण आणि स्वरूपानुसार बदलू शकते. (itbp)

(हेही वाचा – central park thane : एकनाथ शिंदेंनी उभारलेलं ठाण्यातील ग्रँड सेंट्रल पार्क किती मोठे आहे?; काय आहेत सुविधा? )

ITBP कॉन्स्टेबलची जॉब प्रोफाइल आणि जबाबदार्‍या

ITBP कॉन्स्टेबल हे भारताची अंतर्गत आणि सीमा सुरक्षा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या नोकरी प्रोफाइलचा आढावा पुढीलप्रमाणे आहे.

  • सीमा सुरक्षा

आयटीबीपी कॉन्स्टेबलची सर्वात पहिली जबाबदारी म्हणजे हिमालय प्रदेशातल्या भारताच्या सीमेचं रक्षण करणं होय. भारतीय सीमेवर अनधिकृत प्रवेश किंवा बेकायदेशीर हालचालींची खात्री करून कारवाई करणे हे त्यांचं काम आहे. (itbp)

  • गस्त आणि देखरेख

कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे कॉन्स्टेबल नियमितपणे उंच आणि खडकाळ प्रदेशात गस्त घालतात. त्यासाठी ते आधुनिक उपकरणं आणि देखरेख तंत्रांचा वापर करतात.

  • आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद

ITBP कर्मचार्‍यांना भूकंप, भूस्खलन आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये नागरिकांना वाचवण्यासाठी आणि आपत्ती निवारण कार्यात मदत करण्यासाठी प्रशिक्षित केलं जातं.

  • देशाअंतर्गत सुरक्षा

निवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम आणि अशांतता किंवा बंडखोरीमुळे प्रभावित असलेल्या विभागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ITBP कॉन्स्टेबल मदत करतात.

  • प्रशिक्षण आणि कौशल्य विकास

नवीन सुरक्षा प्रोटोकॉल, शस्त्र हाताळणी आणि शारीरिक तंदुरुस्ती मानकांबद्दल अपडेट राहण्यासाठी ITBP कॉन्स्टेबल हे नियमित प्रशिक्षण घेतात.

  • नागरी कर्तव्यांमध्ये सहाय्य

देशाच्या दुर्गम भागात ITBP कॉन्स्टेबल हे अनेकदा वैद्यकीय मदत देऊन किंवा समाज कल्याणकारी कार्यक्रम आयोजित करून सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यास स्थानिक लोकांना मदत करतात. (itbp)

(हेही वाचा – Raigad fishing boat fire : अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला लागली आग ; बोटीत 18 ते 20 खलाशी)

करिअर ग्रोथ आणि पदोन्नती

ITBP मध्ये कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळाल्यामुळे करिअर ग्रोथच्या नव्या संधींसह उत्कृष्ट करिअर घडायला मदत मिळते. करिअरच्या प्रगतीसाठी पदांचा अनुक्रम खालीलप्रमाणे आहे:

  • कॉन्स्टेबल
  • हेड कॉन्स्टेबल
  • असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI)
  • सब-इन्स्पेक्टर (SI)
  • इन्स्पेक्टर

कॉन्स्टेबल्सची पदोन्नती ही त्यांच्या कामगिरी, अनुभव आणि विभागीय परीक्षांवर अवलंबून असते. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर वाढीव जबाबदार्‍या आणि उच्च पगार मिळतो. (itbp)

ITBP मध्ये कॉन्स्टेबल म्हणून सामील होण्याचे फायदे

पगाराव्यतिरिक्त ITBP कॉन्स्टेबल्सना अनेक फायदे मिळतात. जसं की,

  • नोकरीची सुरक्षा : ITBP मध्ये काम करणं म्हणजे एक ठराविक उत्पन्नासोबतच नोकरी सुरक्षित राहते.
  • आरोग्यसेवा सुविधा : ITBP कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत वैद्यकीय सेवा मिळते.
  • पेन्शन आणि निवृत्ती लाभ : नवीन पेन्शन योजना (NPS) अंतर्गत समाविष्ट असलेली पेन्शनची रक्कम ही निवृत्तीनंतर कॉन्स्टेबल्सची आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते.
  • रजा धोरण : ITBP मध्ये कॅज्युअल रजा, अर्जित रजा आणि वैद्यकीय रजा यासह भरपगारी रजा हा पर्याय मिळतो.
  • निवास : कॉन्स्टेबल्सना अनेक ठिकाणी अनुदानित गृहनिर्माण संस्थांमध्ये घर घेता येते.
  • ऍडव्हेंचरच्या संधी : या नोकरीमध्ये पर्वतारोहण, ट्रेकिंग आणि विशेष लढाऊ प्रशिक्षण यांसारख्या रोमांचक आव्हानांचा समावेशही आहे. (itbp)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.