ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञानच आधारस्तंभ; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

मुंबई टेक वीक २०२५ चे उद्घाटन; व्हॉट्सअँप चॅटबॉट, एआय हब, उद्योजक संग्रहालयाच्या योजनांची घोषणा

46
ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञानच आधारस्तंभ; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन
  • प्रतिनिधी

ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करताना तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुंबई टेक वीक २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. महाराष्ट्र स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असून, फिनटेक आणि एआय स्टार्टअप्ससाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईतील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या भविष्यातील विकास आराखड्याबाबत माहिती दिली.

(हेही वाचा – IPL 2025 : माजी इंग्लिश कर्णधार केविन पीटरसन दिल्ली कॅपिटल्सचा नवीन मार्गदर्शक)

महत्त्वाच्या घोषणा आणि सामंजस्य करार (MoU)
  • NPCI ला बीकेसी येथे जागतिक मुख्यालय उभारण्यासाठी भूखंड प्रदान
  • व्हॉट्सअँप चॅटबॉटसाठी महाराष्ट्र सरकार व मेटा यांच्यात करार
  • नॉलेज AI हबसाठी कौशल्य विकास विभाग आणि TEAM यांच्यात करार
  • उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना

(हेही वाचा – अक्षय शिंदे प्रकरणाची पुनरावृत्ती होणार ? Devendra Fadnavis उत्तर देताना म्हणाले …)

महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करणार आहे –

  • वाढवण बंदर – जेएनपीटीच्या तुलनेत तीनपट मोठे आणि २० मीटर खोल असलेले हे बंदर जागतिक सागरी व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ – याच्या आसपास नवे व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र उभारले जाणार आहे.
  • नवी शहरे – नवी मुंबई, नवीन ठाणे आणि वाढवण येथे उद्योगांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवी शहरे विकसित केली जातील.

(हेही वाचा – Uttarakhand मध्ये मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे ४७ कामगार अडकले)

सायबर सुरक्षेवर भर

भविष्यात ७०% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील, त्यामुळे नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले आहे. या यंत्रणेमुळे आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई करता येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न

२००० ते २०१४ दरम्यान तंत्रज्ञान गुंतवणुकीत घट झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादमध्ये गेल्या. मात्र, अटल सेतु आणि अन्य पायाभूत प्रकल्पांमुळे नवी मुंबई हे नव्या तंत्रज्ञान केंद्रात रूपांतरित होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

मुंबईतील वाढते दडपण लक्षात घेता नव्या शहरांच्या उभारणीद्वारे औद्योगिक संधी वाढवण्याचा सरकारचा मानस आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.