पूरग्रस्त भागात मदतकार्य करणा-यांची आरोग्य तपासणी

123

महाड, चिपळूण, सांगली येथील पूरग्रस्त भागात मदतकार्य करुन परतलेल्या सुमारे ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष आरोग्य तपासणी मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी १४५ कर्मचाऱ्यांची तपासणी मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात करण्यात आली.

४०० कर्मचा-यांनी केले मदतकार्य

महाड (जिल्हा – रायगड), चिपळूण (जिल्हा – रत्नागिरी), सांगली (जिल्हा – सांगली) येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर, मुंबई महापालिकेच्या वतीने मदतकार्य करण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार, सुमारे ४०० अधिकारी-कर्मचारी पाठवण्यात आले होते. महाड येथे ११५, चिपळूण येथे २१७ आणि सांगली येथे ८९ असे ४२१ अधिकारी–कर्मचारी मदतकार्यासाठी गेले होते. मदतकार्य पूर्ण करुन ही पथके पुन्हा मुंबईत परतली आहेत.

IMG 20210805 WA0010

(हेही वाचाः जंबो कोविड सेंटरसाठी २० कोटींच्या औषधांची खरेदी)

आरोग्य तपासणीचे आदेश

या सर्व अधिकारी- कर्मचा-यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर घेण्याची सूचना, आयुक्त चहल आणि अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी केली आहे. त्यानुसार उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर सुरू झाले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील पथकाने २५ जुलै ते १ ऑगस्ट २०२१ दरम्यान महाड येथे स्वच्छता मोहीम राबवली होती. हे पथक २ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईमध्ये परत आल्यानंतर या पथकाची गुरुवारी विशेष आरोग्य तपासणी मुंबई महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात पार पडली.

IMG 20210805 WA0008

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.