-
प्रतिनिधी
राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी ३ मार्च २०२५ पासून मुंबईत सुरू होत असून विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माणिक कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी महायुती सरकारला घेरण्याचे मनसुबे आखण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्थेच्या विषयावर गृह विभागाचा पदभार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
शपथ घेतली आणि कार्यक्रम सुरू
राज्यात विधानसभा २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी मतदान झाले आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागला. महायुतीला जनतेने भरभरून मतदान केले आणि अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर १३ दिवसांनी म्हणजेच ५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-अजित पवार यांनी शपथ ग्रहण केली. ७ ते ९ डिसेंबर असे तीन दिवस नव्या आमदारांनी शपथ घेतली तर १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवसापासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू झाले.
(हेही वाचा – रणजीत सावरकर यांची नाशिक येथील Abhinav Bharat Mandir येथे भेट; नूतनीकरणाच्या कामाची पाहणी)
विषय पीक विमा ते हत्या
या अधिवेशनात भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी बीड येथील प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली आणि विरोधकांना मुद्दा मिळाला. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेतील गैरप्रकारापासून सुरू झालेला विषय पुढे जात बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख, तसेच सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात मुंडे यांच्यावरही आरोप करण्यात आले आणि मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली.
मंत्रिपद जाणार का?
दरम्यान, माणिक कोकाटे आणि त्यांच्या बंधूना नाशिक सत्र न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद जाणार का? अशी चर्चा सुरू झाली असतानाच नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने तूर्तास तरी कोकाटे यांना दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचा – Uttarakhand मध्ये मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे ४७ कामगार अडकले)
मुख्यमंत्र्यांनाही घेरण्याची तयारी
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माणिक कोकाटे या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत सरकारला धारेवर धारण्याचे मनसुबे आखले आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसात गुन्ह्यांचे सत्र वाढल्याचा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह विभागाच्या कारभारावरूनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community