भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक बंद; भारतीय निवडणूक प्रभावित करण्याचा आरोप झालेली संस्था USAID च पुरवायची क्लिनिकला निधी

51
भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक बंद; भारतीय निवडणूक प्रभावित करण्याचा आरोप झालेली संस्था USAID च पुरवायची क्लिनिकला निधी
भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक बंद; भारतीय निवडणूक प्रभावित करण्याचा आरोप झालेली संस्था USAID च पुरवायची क्लिनिकला निधी

हैदराबादमधील (Hyderabad) भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक (India’s first Transgender Clinic) ‘मित्र क्लिनिक’ (mitr clinic) बंद झाले आहे. यूएसएआयडी या क्लिनिकला फंडिंग करत असल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे. मध्यांतरी यूएसएआयडीवर (USAID) भारताचे तुकडे करण्यासाठी या संस्थेने निधी पुरवल्याची टीका करण्यात आली होती. तसेच २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला (BJP) हरवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने केला होता.

( हेही वाचा :Railway Accident: रेल्वे रूळ ओलांडताना जातात सर्वाधिक बळी; आकडेवारी आली समोर, वाचा सविस्तर   )  

यूएसएआयडी (USAID) आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या (Johns Hopkins University) पाठिंब्याने जानेवारी २०२१ मध्ये हे क्लिनिक सुरु झाले होते. मित्र क्लिनिकमध्ये ट्रान्सजेंडर समुदायाला आरोग्य सेवा, हार्मोन थेरपी, लिंग पुनर्नियुक्ती समुपदेशन, मानसिक आरोग्य समुपदेशन आणि एचआयव्ही/एसटीआय उपचार रुग्णांना दिले जात होते.

हे क्लिनिक यूएसएआयडीच्या (USAID) प्रकल्पाचा एक भाग होते, जिथे एड्ससारख्या रोगाविरोधात काम केले जात होते. निधी थांबल्यामुळे या मित्र क्लिनिक प्रकल्पावर परिणाम झाला आहे. मस्क म्हणाले की, हे क्लिनिक अमेरिकी करदात्यांच्या डॉलरमुळे चालते. अलिकडेच, अमेरिकन सिनेटर जॉन केनेडी यांनी प्रश्न उपस्थित केला होता की अमेरिकन करदात्यांचे पैसे भारतातील ट्रान्सजेंडर क्लिनिकला का दिले जात आहेत. त्यानंतर आता हे क्लिनिक बंद झाले आहे. (USAID)

‘यूएसएआयडी’वर भारताचे तुकडे करण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप

भाजपा (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी अलीकडेच अमेरिकन ‘यूएसएआयडी’ (USAID) वर गंभीर चर्चा केली आहे. त्यांनी दावा केला की, अमेरिकन संस्था यूएसएआयडी (USAID) कडून भारताचे तुकडे करण्यासाठी विविध संस्थांना निधी दिला आहे. तसेच याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या लोकांना तुरूंगात टाकावे, अशी मागणी दुबे यांनी सरकारकडे केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.