-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मुंबई महानगरपालिका मशीद रेल्वे स्थानकालगत इमारतीत नागरी निवारा केंद्र सुरू करणार आहे. या प्रस्तावित नागरी बेघर निवारा केंद्राची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहणी केली. तसेच, संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. मुंबईत आता पर्यंत अशाप्रकारे १८ नागरी बेघरे निवारे सुर असले तरी एवढया मोठ्याप्रमाणात सुर करण्यात येणारा हा पहिला निवारा केंद्र असेल. (BMC)
मुंबईत कुणीही रस्त्यावर राहू नये तसेच झोपू नये यासाठी मुंबईत नागरी बेघर निवारा केंद्राची उभारणी करण्यात येत असून न्यायालयाच्या निर्देशानुसार १ लाख लोकवस्तीमागे एक निवारा केंद्र बांधण्याचे निर्देश असले तरी मुंबईत अशाप्रकारे केंद्र बांधण्यात बऱ्याच अडचणी येत आहे. त्यामुळे आतापर्यंत किमान २० ते कमाल ३५ खाटांचे निवारा केंद्र विविध ठिकाणी महापालिका मालकीच्या किंवा भाडेतत्वावर जागा घेवून महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आले आहे. त्यातच आता मस्जिद बंदर परिसरात मोठ्या जागेमध्ये बेघर नागरी निवारा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. (BMC)
(हेही वाचा – Pakistan मधील ‘जिहाद्यांचे विद्यापीठ’ असलेल्या मदरशात बॉम्बस्फोट; ५ जणांचा मृत्यू)
मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) च्या मालकीची एक इमारत मशीद रेल्वे स्थानकाजवळ आहे. या इमारतीचे रूपांतर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरी निवारा केंद्रात केले जाणार आहे. निवारा नसलेल्या, बेघर नागरिकांना निवासाची निःशुल्क सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वयंसेवी संस्थेतर्फे (एन. जी. ओ.) या नागरी निवारा केंद्राचे संचलन केले जाईल. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एन. यू. एल. एम.) अंतर्गत विकसित होणाऱ्या या नागरी केंद्रात सुमारे ४५० ते ५०० नागरिकांना निवारा उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन केले जात आहे. (BMC)
या पाहणी दौऱ्याप्रसंगी उप आयुक्त (शिक्षण) तथा संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, बी विभागाचे सहायक आयुक्त शंकर भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी निर्देश दिले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नागरी निवारा केंद्राची उभारणी करावी. पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्था, वीजपुरवठा आदींचे योग्य प्रकारे नियोजन करावे, असेही निर्देश दिले आहेत. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community