-
प्रतिनिधी
देशभरातील बहुतांश राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि जड वाहनांसाठी एचएसआरपी लावण्याचे दर इतर राज्यांप्रमाणेच असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. (‘HSRP’ Number Plate)
निविदा प्रक्रियेनुसार दर निश्चित
एचएसआरपी बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया नियमांनुसार पार पडली असून, सर्वात कमी दर देणाऱ्या तीन कंपन्यांची निवड उच्चाधिकार समितीने केली आहे. या प्रक्रियेनंतर परिवहन आयुक्त कार्यालयाने संबंधित कंपन्यांना कार्यारंभ आदेश दिले. राज्यात लागू करण्यात आलेले दर हे ‘एचएसआरपी’ प्लेट आणि फिटमेंट चार्जेससह निश्चित करण्यात आले आहेत. (‘HSRP’ Number Plate)
(हेही वाचा – BMC : मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ महापालिका उभारणार नागरी बेघर निवार केंद्र)
महाराष्ट्रातील आणि अन्य राज्यांतील दरांची तुलना
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, अन्य राज्यांमध्ये जीएसटी वगळून एचएसआरपीचे दर पुढीलप्रमाणे आहेत :
- दुचाकी : ₹420 ते ₹480
- तीन चाकी : ₹450 ते ₹550
- चार चाकी व जड वाहने : ₹690 ते ₹800
महाराष्ट्रातील दर :
- दुचाकी : ₹450
- तीन चाकी : ₹500
- चार चाकी व जड वाहने : ₹745
या तुलनेवरून महाराष्ट्रातील दर इतर राज्यांशी सुसंगत असल्याचे स्पष्ट होते, असे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. (‘HSRP’ Number Plate)
(हेही वाचा – चीनमध्ये AI Robot ने केला लोकांवर हल्ला; काय आहे संपूर्ण प्रकरण?)
एचएसआरपी बसविणे बंधनकारक का?
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बंधनकारक आहे.
- १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांवर विक्रेत्यांकडून थेट एचएसआरपी बसविण्यात येते.
- १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Pakistan मधील ‘जिहाद्यांचे विद्यापीठ’ असलेल्या मदरशात बॉम्बस्फोट; ५ जणांचा मृत्यू)
SIAM संकेतस्थळावर अधिकृत माहिती उपलब्ध
परिवहन विभागाने स्पष्ट केले की, काही राज्यांमध्ये एचएसआरपी दरांमध्ये फिटमेंट चार्जेस समाविष्ट नाहीत. भारतीय वाहन उद्योग संस्थेच्या (SIAM) अधिकृत संकेतस्थळावर सर्व राज्यांतील दरांची माहिती उपलब्ध आहे. (‘HSRP’ Number Plate)
सरकारचा स्पष्ट दावा – कोणतीही अवाजवी दरवाढ नाही
महाराष्ट्रातील वाहनचालकांकडून एचएसआरपीसाठी तिप्पट पैसे आकारले जात असल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना परिवहन विभागाने सांगितले की, दर निश्चित करताना इतर राज्यांमधील दरांचा विचार करूनच निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील वाहनमालकांनी अफवांवर विश्वास न ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. (‘HSRP’ Number Plate)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community