पुढील पाच वर्षांत मराठी भाषा मंत्रिपदासाठी चढाओढ असेल; Uday Samant यांनी व्यक्त केला विश्वास

39
पुढील पाच वर्षांत मराठी भाषा मंत्रिपदासाठी चढाओढ असेल; Uday Samant यांनी व्यक्त केला विश्वास
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्य मंत्रीमंडळात सध्या महसूल खाते, उद्योग खाते तसेच नगरविकास खात्यांचे मंत्री होण्यासाठी चढाओढ असली तरी पुढील पाच वर्षांत मराठी भाषा मंत्री होण्यासाठी चढाओढ असेल असा विश्वास उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसेनेच्यावतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मुंबई महापालिकेतील वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यांत बोलतांना व्यक्त केला. सध्या या खात्याच्यावतीने १७ देशांशी कारभार जोडला गेला असला तरी भविष्यात ५० देशांशी या खात्याचा कारभा जोडला जाईल असाही विश्वास सामंत यांनी व्यक्ते केला.

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापालिकेत वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Uday Samant)  यांच्यावतीने महापालिकेतील वृत्तांकन करणाऱ्या तसेच गिरगाव दक्षिण मुंबईतील मराठी वार्ताहर तसेच पत्रकारांचा शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना पक्षाचे उपनेते सुनील नरसाळे, दक्षिण मुंबईचे शिवसेना समन्वय प्रमोद मांद्रेकर तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – BMC : मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ महापालिका उभारणार नागरी बेघर निवारा केंद्र)

याप्रसंगी बोलतांना उदय सामंत (Uday Samant) यांनी मराठी भाषा गौरव दिन हा एक दिवस साजरा करण्यापेक्षा ३६५ दिवस साजरा व्हायला हवा असे सांगत कुसुमाग्रजांच्या गावी दोन दिवस कुसुमाग्रज उत्सव पुढील वर्षीपासून साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा ७५० वर्षांपूर्वीच लाभलेला आहे, परंतु आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आणि याबद्दल सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभारही मानले. यावेळी त्यांनी काही लोक मराठीवर अन्याय होऊ देणार नाही आणि हिंदीतून असे सांगतात असे सांगत शिवसेना उबाठाची खिल्ली उडवली तसेच मराठी भाषा भवनाचे काम जलदगतीने सुरु असून आधीच्या मुख्यमंत्र्यांनी या भाषा भवनामध्ये ४० खोल्या काढण्याचे प्रस्तावित केले होते, परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी यातील पाच खोल्या राहण्यासाठी उर्वरीत ४० खोल्या या युपीएससी, एमपीएससीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता याव्या यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलतांना किरण पावसकर यांनी आपल्याच राज्यात मराठीसाठी भांडावे लागते हे दुर्दैव असल्याचे सांगत मराठी भाषेत जो गोडवा आहे, तो इतर भाषेतून संवाद साधताना मिळत नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या स्वप्नातील ४० लाख घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एसआरए योजना राबवली गेली, पण या एसआरए योजनेत मराठी माणसांना किती घरे मिळाली असाही सवाल केला. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी ही पत्रकारांची अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. (Uday Samant)

(हेही वाचा – पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एक खिडकी’ सुरु करा; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांचा निर्णय)

यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी महापालिकेत वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शिवसेनेने केल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी महापालिका वृत्तांकन करणारे मारुती मोरे, प्रसाद रावकर, सचिन धानजी, राजेश सावंत, सुनील शिंदे, गिरीष चित्रे, संजय जाधव, अल्पेश म्हात्रे, अजय जाधव, घनशाम भडेकर, प्रज्ञा रावकर, उदय जाधव, वैदेही काणेकर, चेतन काशिकर आदींचा सन्मान करण्यात आला. तसेच दिवंगत पत्रकार नितीन चव्हाण यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला, त्यांची पत्नी पुजा चव्हाण आणि पुत्र ऋषिकेश चव्हाण यांनी हा सन्मान स्वीकारला. (Uday Samant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.