पालघर जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालयासाठी जमीन उपलब्ध करणार; Chandrashekhar Bawankule यांची घोषणा

54
पालघर जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालयासाठी जमीन उपलब्ध करणार; Chandrashekhar Bawankule यांची घोषणा
  • प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या आदिवासी समाजाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्राधान्य देणार आहे. या उद्देशाने जिल्ह्यातील उमरोळी येथे धर्मादाय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी भाडेपट्यावर जमीन देण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.

(हेही वाचा – पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एक खिडकी’ सुरु करा; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांचा निर्णय)

बैठकीत रुग्णालयासाठी जागेचा आढावा

मुंबई येथील शारदा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. सचिन खरात यांनी उमरोळी येथे २५ हेक्टर जमीन धर्मादाय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाला विनंती केली होती. या संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.

बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, शारदा प्रतिष्ठानचे डॉ. खरात, आमदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी आणि पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडखे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.

(हेही वाचा – Water Shortage : पूर्व उपनगरांतील ‘या’ भागांमध्ये शुक्रवारसह शनिवारीही पाणी संकट)

आदिवासी नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा मोठा फायदा

महसूल मंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले की, पालघर जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे रुग्णालय सुरू करणे सरकारच्या प्राधान्यक्रमात आहे.

  • या रुग्णालयामुळे आदिवासी समुदायाला सहजपणे वैद्यकीय सुविधा मिळतील.
  • हे आरोग्य केंद्र ‘अंत्योदय’ संकल्पनेशी जोडलेले असेल, म्हणजेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • भविष्यात हे धर्मादाय रुग्णालय ‘मुख्यमंत्री सहायता निधी’शी जोडण्यात येईल, त्यामुळे गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळेल.

(हेही वाचा – पुढील पाच वर्षांत मराठी भाषा मंत्रिपदासाठी चढाओढ असेल; Uday Samant यांनी व्यक्त केला विश्वास)

तत्काळ कार्यवाहीसाठी निर्देश

बैठकीदरम्यान महसूल मंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जिल्हा प्रशासनाला लवकरात लवकर जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने हे नवीन धर्मादाय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थानिक जनतेसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.