Chamoli: उत्तराखंडमधील हिमस्खलनात अडकलेल्या २२ कामगारांचा शोध सुरू; २४ तासांनंतर काय आहे परिस्थिती जाणून घ्या

48

Chamoli: उत्तराखंडच्या (Uttarakhand) उंच भागात मुसळधार बर्फवृष्टी (snowfall) दरम्यान, शुक्रवारी सकाळी चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ (Badrinath) येथील सीमावर्ती माना गावाजवळ झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) ५५ कामगारांपैकी ३३ कामगारांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले तर इतर २२ जणांचा शोध सुरू आहे. (Chamoli)

राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन सचिव विनोद कुमार सुमन (Vinod Kumar Suman) यांनी येथे सांगितले की, सुरुवातीला बद्रीनाथ धामपासून (Badrinath Dham) सहा किलोमीटर पुढे झालेल्या हिमस्खलनाच्या घटनेत ५७ कामगार अडकल्याचे वृत्त होते, परंतु आता स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे की, दोन कामगार रजेवर असल्याने घटनास्थळी ५५ कामगार उपस्थित होते. तसेच शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३२ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर रात्री उशिरा आणखी एका कामगाराला बाहेर काढण्यात आले.

(हेही वाचा – राज्यात ‘HSRP’ Number Plate लावण्याचे दर अन्य राज्यांप्रमाणेच; परिवहन विभागाने केले स्पष्ट)

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) यांनी रात्री उशिरा पुन्हा एकदा राज्य आपत्ती ऑपरेशन सेंटरमध्ये पोहोचून बचाव कार्याचा आढावा घेतला. शनिवारी सकाळपासून बचाव कार्यात हवाई दलाचे हेलिकॉप्टर तसेच राज्य सरकारी संस्था ‘युकाडा’ आणि खाजगी कंपन्यांचे हेलिकॉप्टर सहभागी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, “प्रत्येक कामगाराच्या सुरक्षित परतीसाठी आम्ही शक्य ते सर्व करू.” हिमस्खलन बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री धामी शनिवारी घटनास्थळी भेट देऊ शकतात. तसेच सकाळी ७.१५ च्या सुमारास हिमस्खलन झाले आणि कामगार बर्फाखाली गाडले गेले. हे सर्व कामगार नियमितपणे बर्फ काढतात.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : सायबर गुन्हे रोखण्यासाठी १९४५ क्रमांक सरकार घेणार)

कामगार रुग्णालयात दाखल
घटनेची माहिती मिळताच, पोलिस, लष्कर, सीमा रस्ते संघटना, इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि खराब हवामान, सतत बर्फवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीमध्ये बचाव आणि मदत कार्य सुरू केले. चमोलीचे जिल्हा (Chamoli District) दंडाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, लष्कर आणि आयटीबीपीच्या पथकाला १० कामगार आधीच सापडले आहेत आणि ते सध्या आयटीबीपी रुग्णालयात आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.