Raigad वरील रोपवे राहणार बंद; ‘हे’ कारण आलं समोर

100

Raigad : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड किल्ल्यावरील रोपवे ०३ मार्च ते ०७ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. राज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या वयोवृद्ध व शाळकरी मुलांसाठी सोयीस्कर असणारा हिरकणी वाडी येथील रायगड किल्ल्यावरील रोपवे (Raigad Ropeway Closed) हा तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती रायगड रोपवे चे साईट इन्चार्ज राजेंद्र खातू (Rajendra Khatu) यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले आहे. (Raigad)

रायगड किल्ल्याच्या (Raigad forts) पायथ्याशी असणाऱ्या हिरकणी वाडी येथे रायगड रोपवे कार्यरत आहे. या रोपवेच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांसहित राज्याचे व केंद्राचे मंत्री व लाखो शिवभक्त किल्ल्यावर ये जा करीत असतात.  तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणारा किल्ले रायगड पाहण्यासाठी देश विदेशातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून व शाळा महाविद्यालयातून दरदिवशी हजारो पर्यटक किल्ले रायगडावर येत असतात. सर्वच पर्यटकांना रायगडावर पायऱ्यांद्वारे जाणे अनेकांना शक्य होत नसल्याने हिरकणी वाडी (Raigad Fort Hirakni Wadi) येथे असणाऱ्या रायगड रोपवेने अनेक जण किल्ला पाहण्यासाठी जात असतात. या रोपवेच्या सोईमुळे वयोवृद्ध, लहान मुलं, दिव्यांगांना रायगडावर जाणे सहज शक्य झाले आहे. शिवाय या रोपवे मार्गामुळे वेळेची देखील बचत होते. अशा सर्व बाजूंनी उपयोगी पडणारा रोपवे तांत्रिक कामांसाठी बंद असणार आहे.

तसेच, रायगडावर पायी जाणे शक्य नसणाऱ्यांसाठी तसेच वेळेची बचत होण्यासाठी रायगड रोपवे प्रकल्प सन १९९६ साली व्ही. एम. जोग (कै. विष्णू महेश्वर जोग) यांनी स्थापन केला. ते या प्रकल्पाचे जनक आहेत. त्यांच्यामुळेच आज वृद्ध व अपंग तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रायगड किल्ल्यावर जाणे सोईस्कर झाले आहे.

(हेही वाचा – Chamoli: उत्तराखंडमधील हिमस्खलनात अडकलेल्या २२ कामगारांचा शोध सुरू; २४ तासांनंतर काय आहे परिस्थिती जाणून घ्या)

रायगड किल्ल्यावरील रोपवे (Ropeways at Raigad Fort) ३ मार्च ते ७ मार्च या कालावधीत तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याने पर्यटकांची व शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी रायगड रोपवे चे साईट इन्चार्ज राजेंद्र खातू यांनी पर्यटकांना व शिवभक्तांना आगाऊ सूचना या पत्रकाच्या माध्यमातून दिल्या आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.