Sharad Pawar शाडो कॅबिनेटच्या माध्यमातून काँग्रेस-ठाकरे सेनेला शह देणार?

54
Sharad Pawar शाडो कॅबिनेटच्या माध्यमातून काँग्रेस-ठाकरे सेनेला शह देणार?
Sharad Pawar शाडो कॅबिनेटच्या माध्यमातून काँग्रेस-ठाकरे सेनेला शह देणार?
  • मुंबई प्रतिनिधी

राज्यात विरोधी पक्षनेत्याच्या पदावर ठाकरे गटाचा आमदार विराजमान होणार, तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार आहे. मात्र, आमदारसंख्येच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पदांपासून दूर राहणार आहे. त्यामुळे पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी नव्या रणनितीचा अवलंब करत शाडो कॅबिनेट (Shadow Cabinet) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – राज्यात ‘HSRP’ Number Plate लावण्याचे दर अन्य राज्यांप्रमाणेच; परिवहन विभागाने केले स्पष्ट)

महाविकास आघाडीमध्ये देखील चलबिचल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून स्थापन करणार असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील याबद्दल दुमत निर्माण झाले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या खेळीमुळे ठाकरे गट आणि काँग्रेस यांना देखील शह दिल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी शरद पवार गटाकडे दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता पद न मिळाल्यामुळे आपले स्वतःचे व्यक्तिगत अस्तित्व सिद्ध करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.

महायुती सरकारमध्ये प्रभावी विरोधी पक्ष उभा राहण्यासाठी आवश्यक असणारी आमदारसंख्या महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाकडे नाही. तरीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी विरोधी पक्ष नेतेपद मान्य करण्यास सकारात्मकता दाखवली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून संख्याबळाच्या आधारे विरोधी आवाज दडपला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी शाडो कॅबिनेट मंत्रिमंडळ स्थापन करून ठाकरे गट आणि काँग्रेसवरही राजकीय दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

(हेही वाचा – Raigad वरील रोपवे राहणार बंद; ‘हे’ कारण आलं समोर)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून अप्रत्यक्ष सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये नाराजी असल्याने काही आमदार सत्ताधारी महायुतीत जाण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार गट शाडो कॅबिनेटच्या माध्यमातून आपले वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

याआधी, २०२२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी असाच प्रयोग केला होता. मात्र, त्यानंतर या कॅबिनेटचे कोणतेही ठोस कार्य पुढे आले नाही, अशी टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली होती. त्यामुळे आता शरद पवारांच्या या नव्या प्रयोगाला सत्ताधाऱ्यांचा आणि जनतेचा किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.