
उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:१५ वाजता झालेल्या हिमस्खलनात (Uttarakhand Avalanche) दोघांचा मृत्यू झाला आहे. बर्फाचा ढिगारा कोसळला आणि ५५ लोक त्याखाली अडकले होते. रात्री ८ वाजेपर्यंत ३३ जणांना वाचवण्यात यश आले. आज १६ लोकांना बाहेर काढण्यात आले. म्हणजेच एकूण ४९ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. ६ जणांचा शोध सुरू आहे. (Uttarakhand Avalanche)
हेही वाचा-Champions Trophy 2025 : जोस बटलर इंग्लंडचे कर्णधारपद सोडणार ! कारण आलं समोर …
हिमस्खलनात अडकलेल्या ५५ कामगारांमध्ये बिहारचे ११, उत्तर प्रदेशचे (UP) ११, उत्तराखंडचे ११, हिमाचल प्रदेशचे ७, जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir) १ आणि पंजाबचे १ कामगारांचा समावेश आहे. उत्तराखंड सरकारने जाहीर केलेल्या यादीत १३ कामगारांची नावे आहेत, परंतु त्यांचे पत्ते आणि मोबाईल नंबर नाहीत. उर्वरित कामगारांची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. (Uttarakhand Avalanche)
हेही वाचा-Employment Fraud: सीमाशुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून ४ जणांना घातला लाखोंचा गंडा
बचावकार्यात ४ लष्करी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. लष्कर, आयटीबीपी, बीआरओ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे २०० हून अधिक सैनिक बचाव कार्यात गुंतले आहेत. बद्रीनाथपासून ३ किमी अंतरावर असलेल्या चमोलीच्या माना गावात ही घटना घडली. (Uttarakhand Avalanche)
हेही वाचा-Sharad Pawar शाडो कॅबिनेटच्या माध्यमातून काँग्रेस-ठाकरे सेनेला शह देणार?
सर्व सुटका केलेल्या कामगारांना माना गावातील आयटीबीपी कॅम्पमध्ये आणण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघाताबाबत एसडीआरएफ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री, लष्कर, आयटीबीपी आणि एनडीआरएफ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. (Uttarakhand Avalanche)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community