महत्त्वाच्या खात्यांपासून DCM Eknath Shinde दूर का?

66
महत्त्वाच्या खात्यांपासून DCM Eknath Shinde दूर का?
  • प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःकडे असलेल्या तीन महत्त्वाच्या खात्यांचे विधिमंडळातील उत्तरदायित्व आपल्या सहकारी मंत्र्यांकडे सोपवले आहे. नगरविकास विभागाच्या प्रश्नांची उत्तरे मंत्री उदय सामंत, सार्वजनिक उपक्रम (एमएसआरडीसी) विभागाच्या प्रश्नांची उत्तरे दादा भुसे, तर गृहनिर्माण विभागाच्या प्रश्नांची उत्तरे शंभूराज देसाई देतील. यामुळे एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी विधिमंडळाच्या कामकाजापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – Employment Fraud: सीमाशुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून ४ जणांना घातला लाखोंचा गंडा)

विरोधकांचा हल्लाबोल संभवतो

तीन मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात नगरविकास आणि एमएमआरडीए विभागांतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पातील कथित लाचखोरी प्रकरण गाजण्याची शक्यता असून, फ्रान्सच्या एका कंपनीने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर बिल मंजुरीसाठी लाच मागितल्याचा आरोप केला आहे.

यामध्ये नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी या प्रश्नांपासून लांब राहण्यासाठीच सहकारी मंत्र्यांना जबाबदारी दिली का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचा – कोयना परिसर पर्यटन हब बनविणार; पर्यटनमंत्री Shambhuraj Desai यांचे विधान)

शिंदेंची राजकीय खेळी?

शिवसेनेत सध्या अस्वस्थता वाढत असून, पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळेच विधिमंडळात होणाऱ्या वादग्रस्त चर्चांपासून स्वतःला दूर ठेवत शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? अशी शक्यता व्यक्त होत आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून स्वतःला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी महत्त्वाच्या खात्यांच्या प्रश्नोत्तरांपासून माघार घेतली का? हे अधिवेशनातील चर्चेत स्पष्ट होईल. मात्र, एकनाथ शिंदेंची ही खेळी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.