Bhopal मध्ये ‘आप’ने प्रदेश कार्यालयाच्या जागेचे भाडेच भरले नाही; जागामालकाने कार्यालयाला ठोकले टाळे

36
Bhopal मध्ये 'आप'ने प्रदेश कार्यालयाच्या जागेचे भाडेच भरले नाही; जागामालकाने कार्यालयाला ठोकले टाळे
Bhopal मध्ये 'आप'ने प्रदेश कार्यालयाच्या जागेचे भाडेच भरले नाही; जागामालकाने कार्यालयाला ठोकले टाळे

भोपाळमध्ये (Bhopal) आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीतील (Delhi Assembly Elections) पराभवानंतर मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमधील (Bhopal) ‘आप’च्या (Aam Aadmi Party) प्रदेश कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे प्रदेश कार्यालय बिना भाडे भरत सुरु आहे. त्यामुळे घरमालकाने या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. सुभाष नगरमधील या कार्यालयात बऱ्याच काळापासून पक्षाचे उपक्रम सुरू होते, पण भाडे देत नसल्याने घरमालकाने कठोर कारवाई केली आहे.

( हेही वाचा : Nashik मध्ये संस्कृत विश्वविद्यालय होण्यासाठी महंत अनिकेत शास्त्रींच्या प्रयत्नांना यश

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, घरमालक विवेक गंगलानी यांनी नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की, या कार्यालयाच्या भाड्यासोबतच वीज बिलही प्रलंबित आहे. एवढेच नाही तर गंगलानी यांनी कार्यालयात दारूचे बॉक्स ठेवल्याचे आणि इतर आक्षेपार्ह कामे केल्याचा आरोपही ‘आप’वर (Aam Aadmi Party) केला आहे. गंगलानी म्हणतात की, जेव्हा मी ‘आप’च्या भोपाळमधील प्रमुखांकडे भाडे मागितले तेव्हा मला धमकावण्यात आले. त्यामुळे मी पोलिसात तक्रार दाखल केली.

‘आप’चा (Aam Aadmi Party) दिल्लीतील पराभवाचा परिणाम आता इतर राज्यांमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहे. भोपाळमधील या कार्यालयाचे भाडे सुमारे ५० हजार रुपये असल्याचे सांगितले जाते, जे दोन ते चार महिन्यांपासून बाकी आहे. त्यामुळेच घरमालकाने कुलूप लावले, पण त्याचवेळी ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांना याची माहितीही नव्हती. मध्य प्रदेश प्रदेशाध्यक्ष राणी अग्रवाल म्हणाल्या की, मला याबद्दल काहीही माहिती नाही. मी भोपाळमधील (Bhopal) पदाधिकाऱ्यांशी बोलेन. तसेच भोपाळ जिल्हाध्यक्ष सीपी सिंह चौहान (CP Singh Chauhan) यांनीही काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

दरम्यान ‘आप’मध्ये (Aam Aadmi Party) मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील पराभवानंतर, आप (Aam Aadmi Party) नेते दुभंगलेले दिसतात आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. ‘आप’ने मध्य प्रदेशात आपली मुळे मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. पण विधानसभेत ‘आप’ला अपेक्षित यश मिळाले नाही. घरमालकाचे म्हणणे आहे की, कार्यालयात कोणतेही विशेष काम होत नव्हते आणि भाडे न भरल्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले. त्याच वेळी, काही लोक याला दिल्लीतील पराभवाचा परिणाम मानत आहेत, ज्यामुळे पक्षाच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला आहे. (Bhopal)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.