
महाकुंभानंतर (Mahakumbh) आता प्रयागराजमध्ये (Prayagraj) जातीय हिंसाचाराचे षड्यंत्र घडवण्याचा कट रचला जात आहे. त्यातच महाकुंभानंतर ४८ तासांच्या आत हिंदू धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या गाईच्या वासराची हत्या करून धड इकडे तिकडे फेकलेले आढळले. शहरातील दरियााबाद पोलिस स्टेशनजवळील (Daryabad Police Station) रस्त्यावर आणि नाल्यात वासराचे शीर आणि पाय फेकलेले आढळले.
( हेही वाचा : जोधपूरमध्ये Indian Navy च्या सरावात सैन्याच्या तिन्ही दलांचा सहभाग )
वासराची हत्या करून धड इकडे तिकडे फेकलेले पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांनी तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांची चौकशी केली आणि तपास सुरू केला. आरोपीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी जवळच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज देखील तपासले. दरियाबाद येथील रहिवासी गोपाल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून, अत्रासुईया पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दि. २७ फेब्रुवारी रोजी वाहतूक क्षेत्रात काम करणारे गोपाल अग्रवाल (Gopal Agarwal) घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्या गेटवर एका वासराचे कापलेले धड पडलेले दिसले. यानंतर, त्यांनी पाहिले की त्याचे शेजारी वकील दीपक कपूर आणि इतर अनेक लोकांच्या घरासमोर याच वासराचे कापलेल्या पायाचे अवशेष होते. ही माहिती इतर लोकांना मिळताच एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच तीन पोलिस ठाण्यांचे पोलिस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी माहिती दिली आणि पशुवैद्यांना बोलावले. यानंतर एक पथक आले आणि त्यांनी तपास केला आणि गुरांचे अवशेष सोबत नेले. पोलिस स्टेशनचे प्रभारी संजय द्विवेदी म्हणतात की, अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्विवेदी म्हणतात की, कोणीतरी हे जाणूनबुजून वातावरण बिघडवण्यासाठी केले आहे. या एफआयआरमध्ये दोन मोठे आरोप करण्यात आले आहेत.
एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, हिंदूंच्या (Hindu) घरांवर खूण करण्यात आली होती आणि वासराचे अवशेष जाणीवपूर्वक तेथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात ही घटना घडली त्या परिसरात मुस्लिम वस्ती असल्याने मुस्लिम समुदायातील काही धर्मांध हे कृत्य करू शकतात, असेही त्यात म्हटले आहे. या परिसरात मुस्लिमांची लोकसंख्या मोठी आहे.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यासंदर्भातील माहिती संबंधित पोलिस ठाण्याला देण्यात येत आहे. मात्र, ज्यांनी वासराचे डोके आणि पाय कापून फेकून दिले त्यांना आजपर्यंत पकडण्यात आलेले नाही. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी लोकांनी केली आहे. गेल्या पाच महिन्यांतील ही तिसरी घटना आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community