अत्याचारासंबंधी महिलेने केलेल्या तक्रारीची एकतर्फी चौकशी होऊ शकत नाही. केवळ तक्रारदार महिला असल्याने, सर्व प्रकरणांमध्ये, तिचे म्हणणे सत्य मानू नये, तक्रारीचा दोन्ही बाजूने तपास होणे आवश्यक आहे, असे मत केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) व्यक्त केले. न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन यांनी याविषयावर हे निरीक्षण नोंदवले.
(हेही वाचा Bombay High Court मध्ये सुरू असलेल्या सुनावणीचे रेकॉर्डिंग करणे एका तरुणाला पडले महागात; अशी केली कारवाई )
निर्दोषांना जेव्हा अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जाते तेव्हा त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळते, त्यांची झालेली हानी भरून काढू शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा तक्रारींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याचे आवाहन पोलिसांना केले. पोलिस अधिकाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे, तपासाच्या टप्प्यातच गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सत्य शोधले पाहिजे. आजकाल, जर आरोपपत्र दाखल केले गेले तर अशा निर्दोष व्यक्तींच्या प्रकरणाचा न्यायालयाकडून (Kerala High Court) विचार करण्यास वर्षानुवर्षे लागू शकतात. अशा परिस्थितीत, अशा प्रकरणांमध्ये आरोपपत्र नोंदवण्यापूर्वी आणि दाखल करण्यापूर्वी तपास अधिकाऱ्यांनी दोनदा विचार केला पाहिजे…..म्हणून, गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी, धान्यापासून भुसा वेगळे करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे, न्यायालयाने (Kerala High Court) म्हटले.
Join Our WhatsApp Community