पालघर कार्यालयातून आश्रमशाळा व वसतिगृहातील ३४० प्रशिक्षणार्थ्यांना FOSTAC Training

53
पालघर कार्यालयातून आश्रमशाळा व वसतिगृहातील ३४० प्रशिक्षणार्थ्यांना FOSTAC Training
  • प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याच्या पालघर कार्यालयातून जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहातील ३४० प्रशिक्षणार्थ्यांना फोसटेक (Food Safety Training And Certification) प्रशिक्षण देण्यात आले. गुरुवार दि. २७ फेब्रुवारी व शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी हे प्रशिक्षण मंत्री नरहरी झिरवळ यांच्या सूचना व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य आयुक्त यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आले. (FOSTAC Training)

(हेही वाचा – Drugs प्रकरणात पोलिसांचा संबंध आढळल्यास थेट होणार बडतर्फ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा)

प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आणि पार्श्वभूमी

हा उपक्रम अन्न सुरक्षा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आखण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहातील अधिक्षक/अधिक्षिका, गृहपाल व संबंधित जबाबदार व्यक्ती यांना अन्न सुरक्षेबाबत जागरुक करण्यात येत असून, भविष्यात अन्न विषबाधा किंवा अन्न सुरक्षा विषयक तडजोड टाळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकारण, नवी दिल्ली यांच्या माध्यामातून “Eat Right Initiative” हा उपक्रम राबवून अन्न व्यवसायाशी संबधित व्यक्तींना FoSTaC प्रशिक्षण देण्यात येत असून त्यांना Food Safety Supervisor म्हणून प्रमाणित केले जाते. (FOSTAC Training)

(हेही वाचा – AI निर्मित प्रेयसीने प्रियकराला कसा घातला २४ लाखांचा गंडा?)

प्रमुख मार्गदर्शक आणि उपस्थित व्यक्ती

प्रशिक्षणाचे नियोजन अन्न सुरक्षा अधिकारी गो. वि. माहोरे व उ. रा. कावळे यांनी केले होते. कोकण विभागाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे कार्य सुरळीत पार पडले. सहायक आयुक्त (अन्न) द. सु. साळुंखे व प. रा. सिंगरवाड यांनी प्रशिक्षणार्थींना अन्न सुरक्षा व स्वच्छता, अन्नपदार्थ हाताळणी तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळणी संदर्भातील महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले.

भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या अधिकृत प्रशिक्षण भागीदार RIR Certification चे प्रशिक्षक हुमा यांनी सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचवण्याबाबत प्रशिक्षण दिले. (FOSTAC Training)

(हेही वाचा – संक्रमण गाळे वाटपाच्या सुनावणीला त्यापैकी एकही अर्जदार राहिला नाही उपस्थित; MHADA ने दिली पुन्हा संधी!)

आगाऊ उपक्रम व उपस्थिती

अन्न सुरक्षा विषयक जागरुकता मोहिमेच्या संदर्भात, मागील आठवड्यात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी व शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य केंद्रस्थानी अन्न सुरक्षा प्रशिक्षण व जनजागृती मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. मंत्री नरहरी झिरवळ यांनी अन्न सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे आश्वासन दिले होते. या उपक्रमाच्या प्रभावामुळे, इगतपूरी येथील सेंट्रल किचनचा परवाना अन्न सुरक्षा विभागाने निलंबित करुन आदिवासी शाळकरी मुलांच्या आरोग्यास सुरक्षिततेचा विशेष विचार करण्यात आला.

पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नियमितपणे नाष्टा व जेवण पुरविण्यात येत असून, अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्यासंबंधीचे प्रशिक्षण भविष्यात अन्न विषबाधा टाळण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या उपक्रमामुळे अन्न सुरक्षा व स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने एक नवा मानदंड स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला जातो. (FOSTAC Training)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.