Doon Express Accident : हरदोईमध्ये मोठा अपघात टळला; रुळावर नट-बोल्ट, दगड ठेवणाऱ्या २ धर्मांधांना अटक

97

हरदोई (उत्तरप्रदेश) येथे दून एक्स्प्रेस रुळावरून उतरण्याचा कट लोको पायलटच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. दून एक्सप्रेस हरदोई येथे येताच लोको पायलटला रूळावर लोखंडी नट बोल्ट आणि दगड असल्याचे लक्षात येते. त्याच वेळी लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावले आणि ट्रेन थांबवली. (Doon Express Accident)

हरदोई (Hardoi) रेल्वे स्टेशनजवळ पिहानी चुंगी रेल्वे क्रॉसिंगवर 10 ते 15 मीटर अंतरावर हे नट-बोल्ट आणि दगड ठेवले होते. त्यावरून हा ट्रेनचा मोठा अपघात घडवण्याचा डाव असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जेव्हा अधिकाऱ्यांनी तपासणी केली, तेव्हा त्यांना हे नट बोल्ट आणि दगड आढळून आले.

(हेही वाचा – Delhi Pollution: दिल्लीत ‘या’ वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही; 31 मार्चपासून नियम लागू)

कसा उघड झाला कट ?

ज्या ठिकाणी नट बोल्ट आढळले, त्या ठिकाणी लोको पायलटने उतरून पाहिले असता तिथे २ मुले संशयास्पदरित्या फिरतांना दिसली. त्यांना पकडून ट्रेनमध्ये बसवले आणि हरदोई रेल्वे स्थानकावर (Hardoi Railway Station) आणण्यात आले. या दोन्ही तरुणांना रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) ताब्यात देण्यात आले. हरदोई येथे इंजिनाची कसून तपासणी केल्यानंतर ३५ मिनिटांनंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

आरोपींची रवानगी कोतवाल पोलिसांकडे

रेल्वे सुरक्षा दलाचे प्रभारी निरीक्षक आर. बी. सिंह यांनी सांगितले की, हरदोई जिल्ह्यातील बिलग्राम पोलीस स्टेशनच्या कानरी येथील १५ वर्षीय रहिवासी आणि सांडी पोलीस स्टेशनच्या सहौरा येथील १६ वर्षीय रहिवासी यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींची रवानगी कोतवाल पोलिसांकडे करण्यात आली आहे. ही दोन्ही मुले धर्मांध आहेत.

यापूर्वीही केलेली कारस्थाने

दोन महिन्यांपूर्वी बरेलीमध्ये (bareilly train derailment) रेल्वे रुळावरून उतरण्याचा कट रचण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी कानपूरमधील (Kanpur) बराजपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर एक सिलेंडर सापडला होता. त्याच रेल्वे रुळावर भरलेले गॅस सिलिंडर आणि पेट्रोल बॉम्ब ठेवून कालिंदी एक्स्प्रेस गाडी उडवण्याचा कट रचण्यात आला होता. (Doon Express Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.