Rs 2000 Notes Withdrawal : २ हजार रुपयांच्या सगळ्या नोटा जमा झाल्या का ? आरबीआयने दिली माहिती

Rs 2000 Notes Withdrawal : २ हजार रुपयांच्या नोटांपैकी ९८.१८ टक्के नोटा परत बँकेत जमा झाल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिली

90

नोटाबंदीनंतर (demonization) केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या चलनात आणल्या. त्या मागे घेण्याची घोषणा १९ मे २०२३ रोजी केली. या २ हजार रुपयांच्या नोटांपैकी ९८.१८ टक्के नोटा परत बँकेत जमा झाल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिली आहे. आता केवळ ६,४७१ कोटी रुपये किमतीच्या नोटा लोकांकडे आहेत. (Rs 2000 Notes Withdrawal)

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : टीम इंडिया की न्यूझीलंड ; कोणता विजेता संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी भिडणार ?)

आरबीआयने (Reserve Bank of India) दिलेल्या माहितीनुसार या नोटा मागे घेण्याची घोषणा केली, तेव्हा ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यात मोठी घट झाली. त्यामुळे सध्या चलनात ६,४७१ कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ ही नोटा बदलण्याची व त्या बँकेत जमा करण्याची शेवटची तारीख होती. (2000 notes demonetisation) असे असले, तरी आरबीआयच्या १९ कार्यालयांमध्ये आजही दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करून घेतल्या जातात. दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतलेला असला, तरी या नोटांना अजूनही कायदेशीर चलन म्हणून मान्यता असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

सर्वसामान्य नागरिक टपाल कार्यालयाच्या माध्यमातून या आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आरबीआयच्या कोणत्याही कार्यालयात पाठवू शकतात. (Rs 2000 Notes Withdrawal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.