West Bengal: जादवपूर विद्यापीठात राडा! एसएफआय विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्र्यांसह अनेक प्राध्यापकांना ओलीस धरले

82
West Bengal: जादवपूर विद्यापीठात राडा! एसएफआय विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्र्यांसह अनेक प्राध्यापकांना ओलीस धरले
West Bengal: जादवपूर विद्यापीठात राडा! एसएफआय विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्र्यांसह अनेक प्राध्यापकांना ओलीस धरले

जाधवपूर विद्यापीठात (Jadavpur University) शनिवारी (१ मार्च) डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने पश्चिम बंगालचे (West Bengal) शिक्षण मंत्री ब्रात्य बसू (Bratya Basu) यांच्यावर हल्ला केला. पश्चिम बंगाल कॉलेज अँड युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (WBCUPA) च्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी हजेरी लावली होती. ही तृणमूल समर्थक प्राध्यापकांची संघटना आहे. या हल्ल्यात मंत्री बसू जखमी झाले आणि त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांवरही हल्ला झाला आणि या संघर्षात काही विद्यार्थी जखमी झाले. (West Bengal)

शिक्षण मंत्री ब्रात्य बसू येण्यापूर्वीच विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेण्याची मागणी करत डाव्या विद्यार्थी संघटना आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना घेरले, तसेच त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पश्चिम बंगाल कॉलेज अँड विद्यार्थी प्रोफेसर असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांना तिथून जाण्यास सांगितले. मात्र त्यामुळे तणाव आणखीनच वाढला. तसेच आंदोलक विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. (West Bengal)

यादरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री ब्रत्य बसू यांच्या कारला रोखले. तसेच कारच्या टायरची हवा सोडून कारची मोडतोड केली. आंदोलक विद्यार्थी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी मंत्रिमहोदयांना सुमारे २ तास ओलीस ठेवले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा धक्काबुक्की झाली. तसेच त्यात एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. (West Bengal)

प्राध्यापकांवरही हल्ला झाला
निदर्शकांनी WBCUPA प्राध्यापकांवरही हल्ला केल्याचे वृत्त आहे. प्राध्यापक ओमप्रकाश मिश्रा यांचा आंदोलकांनी काठ्यांनी पाठलाग केला. विद्यापीठाच्या रक्षकांनी त्यांना वाचवले. या हल्ल्यात दोन प्राध्यापक जखमी झाल्याचे वृत्त आहे, तर एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. काही विद्यार्थ्यांनी एका महिला प्राध्यापकाची साडी फाडल्याचा आरोप आहे. यापूर्वी, WBCUPA कार्यक्रमादरम्यान बसू भाषण देत असताना काही SFI निदर्शकांनी त्यांना घेरले होते. त्यांनी खुर्च्या फेकल्या आणि कार्यक्रमस्थळाची तोडफोड केली. (West Bengal)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.