१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (HSRP) लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. या ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ची (High security registration number plate) किंमत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात (Maharashtra) जास्त आहे. त्यावर वाहनधारकांना १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे, असे समोर येत आहे. हा १८ टक्के जीएसटी वाहनधारकांना द्यावा लागणार असल्याचे समोर येत आहे.
(हेही वाचा – पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा; Ashish Shelar यांचे आवाहन)
त्यावर आता राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार (Vivek Bhimanwar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नव्या नंबर प्लेटच्या संदर्भात समाज माध्यमांवर काही बातम्या येत आहेत. महाराष्ट्रातील नंबर प्लेटचे दर हे इतर राज्यातील दरांहून अधिकचे नाहीत, असे आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले.
आयुक्त विवेक भीमनवार यांनी म्हटले की, नंबर प्लेटच्या संदर्भातील टेंडर प्रक्रिया ही आपण नियमांनुसार केलेली आहे. त्याला हाय पावर कमिटीची मान्यता देखील प्राप्त आहे. इतर राज्यांचे दर व आवश्यक त्या सर्व बाबी हाय पावर कमिटीला दाखवून आणि त्यांच्या परवानगी घेतली. त्यानंतरच टेंडर संदर्भातील कारवाई करण्यात आलेली आहे. इतर राज्यांमधील प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेसमुळे लोकांच्या मनात थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. फिटमेंट चार्जेसच्या नावाखाली लोकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात होते. या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेस एकत्र घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुणालाही प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेस वेगवेगळ्या प्रकारे आकारता येणार नाहीत.
कोणत्या गाड्यांना नंबर प्लेट आवश्यक
1 एप्रिल 2019 पासूनच्या गाड्यांना ही नंबर प्लेट लावणे आवश्यक नाही. त्यापूर्वीच्या गाड्यांना ही नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये यासाठी पर्याप्त सेंटर उभारण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी सेंटर्स उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना आरटीओ अधिकाऱ्यांना आवश्यक ते सेंटर उभारण्यासाठी कारवाईच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.
इतर राज्यांमधील नंबर प्लेटचे दर देखील वेबसाईटवर उपलब्ध आहेत ते आपण तपासावेत, असे आवाहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community