
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) गट टप्प्यातील अखेरचा सामना आज अ गटातील भारत वि. न्यूझीलंड (IND vs NZ) या संघांमध्ये खेळवला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे संघ आधीच पात्र ठरले आहेत. पण कोणते संघ एकमेकांविरूद्ध भिडणा र, हे आजच्या सामन्याच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. (Champions Trophy 2025)
शुभमन गिल फॉर्ममध्ये
आजच्या सामन्यात न्यूझीलंड संघावर मात करू शकणारे अनेक खेळाडू भारतीय संघात आहेत. शुभमन गिलची बॅट न्यूझीलंडविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करते. गिलने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले होते. गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. पाकिस्तानविरुद्धही त्याचे अर्धशतक हुकले पण त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलेच झळकावले. (Champions Trophy 2025)
अक्षर पटेलकडे चित्र बदलण्याची ताकद
कुलदीप यादव हा टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजी संघातील सर्वात मोठा शस्त्र आहे. मधल्या षटकांमध्ये टीम इंडियासाठी विकेट मिळवून देण्याची जबाबदारी कुलदीपवर आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीने नुकतेच पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून पुनरागमनाची घोषणा केली. विराट फॉर्ममध्ये परतला आहे आणि आता प्रत्येक सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा असतील. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडेही स्वतःच्या बळावर खेळाचे चित्र बदलण्याची ताकद आहे. एक हुशार फलंदाज असण्यासोबतच, अक्षर पटेल चेंडूने कोणत्याही संघाला कठीण वेळ देऊ शकतो. याशिवाय, अक्षर पटेल हा एक अद्भुत क्षेत्ररक्षक आहे. (Champions Trophy 2025)
विराट कोहली खेळणार ३०० वा वनडे सामना
न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच विराट कोहली इतिहास रचणार आहे. विराट कोहली त्याच्या वनडे कारकिर्दीतील ३०० वा वनडे सामना खेळणार आहे. कोहलीपूर्वी ३०० वनडे खेळलेल्या भारतीयांमध्ये सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांचा समावेश आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community