Women’s Premier League : आरसीबीचा पराभव करत दिल्ली कॅपिटल्सची प्ले ऑफमध्ये एन्ट्री

41
Women's Premier League : आरसीबीचा पराभव करत दिल्ली कॅपिटल्सची प्ले ऑफमध्ये एन्ट्री
Women's Premier League : आरसीबीचा पराभव करत दिल्ली कॅपिटल्सची प्ले ऑफमध्ये एन्ट्री

महिला प्रीमिअर लीगच्या २०२५ (Women’s Premier League) च्या हंगामातील १४ व्या लढतीत शफाली वर्माच्या (Shafali Verma) धमाकेदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं यंदा महिला डब्ल्यूपीएलचं तख्त राखण्यासाठी प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे.

यंदाच्या तिसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धची लढाई जिंकत दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं प्ले ऑफ्समध्ये एन्ट्री मारली आहे. महिला प्रीमिअर लीगममध्ये (Women’s Premier League) प्ले ऑफ्समधील स्थान पक्के करणारा दिल्ली कॅपिटल्स हा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात शफाली वर्मानं (Shafali Verma) ४३ चेंडूत ८ चौकार आणि ४ उत्तुंग षटकाराच्या मदतीने नाबाद ८० धावांची खेळी केली. तिच्याशिवाय जेस जोनासन (Jess Jonassen) हिने ३८ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली.

(हेही वाचा – Makhana Benefits : मखाना हे दैनंदिन आहाराचा एक भाग म्हणून सेवन केले तर काय फायदा होईल?)

स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) महिला संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना एलिस पेरी (Ellyse Perry) ६०(४७) च्या अर्धशतकाशिवाय राघवी बिष्टनं केलेल्या ३२ चेंडूतील ३३ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १४७ धावा करत दिल्ली कॅपिटल्स महिला संघासमोर १४८ धावाचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघातील सलामीची बॅटर शफाली वर्माची (Shafali Verma) बॅट तळपली अन् आरसीबीवर पराभवाची नामुष्की ओढावली.

आरसीबीच्या (RCB) संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. कॅप्टन मेग लॅनिंग (Meg Lanning) २ षटके खेळून फक्त २ धावा करून तंबूत परतली. २.४ षटकात धावफलकावर फक्त ५ धावा असताना दिल्ली कॅपिटल्स संघानं आपली पहिली विकेट गमावली होती. त्यामुळे या सामन्यात स्मृती मानधनाचा (Smriti Mandhana) गत चॅम्पियन आरसीबी संघ दिल्ली कॅपिटल्सला धावांचा पाठलाग करताना दमवणार, असे चित्र निर्माण झाले होते. पण शफाली वर्मानं (Shafali Verma) टॉप गियर टाकला तिला जेस जोनासनची (Jess Jonassen) साथ मिळाली अन् दोघींनीच १६ व्या षटकात ९ विकेट्स राखून मॅच संपवली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.